भाजपचे खासदार अमित शाह यांच्या खांद्यावर केंद्रीय गृहमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आल्यानं, अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर शर्यतीत सर्वात आघाडीवर असणाऱ्या जे. पी. नड्डा यांची मोदींच्या उपस्थितीत कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशामध्ये भाजपाने मिळवलेल्या यशामध्ये जे. पी. नड्डा यांचा मोलाचा वाटा आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपानं 80 पैकी तब्बल 62 जागा जिंकल्या आहेत.
अमित शहांच्या यांची गृहमंत्रीपदी नियुक्ती केल्यानंतर आपल्याकडील पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य व्यक्तीकडे सोपवावी, असे शाह यांनी सांगितले होते. त्यानुसार पक्षाच्या संसदीय मंडळाने जे.पी. नड्डा यांची नियुक्ती पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
J P Nadda | जे पी नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष, भाजपच्या संसदीय बोर्डाचा निर्णय | नवी दिल्ली | ABP Majha
कोण आहेत जे. पी. नड्डा?
- 1978 साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे राष्ट्रीय सचिव
- 1993, 1998 आणि 2007 या काळात हिमाचलमधून आमदार
- 1998 साली हिमाचल सरकरामध्ये आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री, संसदीय कामकाज मंत्री
- 2007 साली प्रेम कुमार धुमाळ यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
- 2010 साली राष्ट्रीय राजकारणात सक्रीय
- 2012 मध्ये राज्यसभेत खासदार
एकीकडे भाजपनं अध्यक्षाची घोषणा केली असली तरी काँग्रेसला मात्र अध्यक्ष सापडत नाही आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विनवणी करुनही राहुल गांधी अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.. त्यामुळं काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करायची याबाबत काँग्रेसमध्ये अजूनही संभ्रम पाहायला मिळतोय.