मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेरोजगारीचं संकट ओढावलं. आता नोकऱ्या कुठे आहेत? असा प्रश्न सुशिक्षित बेरोजगारांपुढे आहे. 'जॉब माझा' च्या माध्यमातून विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा या विषयीची माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे. गेल (इंडिया) लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 220 जागांसाठी आणि महाराष्ट्र दूरसंचार विभागात 33 जागांसाठी भरती होत आहे.  


गेल (इंडिया) लिमिटेड आणि महाराष्ट्र दूरसंचार विभागातील नोकरीसाठी खालील प्रमाणे अर्ज करा.  


गेल (इंडिया) लिमिटेड- एकूण पदसंख्या 220
(संपूर्ण देशभरात ही भरती होतेय).


पदाचे नाव – वरिष्ठ अभियंता
एकूण जागा – 115
शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग पदवी, 1 वर्षाचा अनुभव


पदाचे नाव – वरिष्ठ अधिकारी
एकूण जागा – 69
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी/ MBA /CA /CMA /LLB, 1 वर्षाचा अनुभव


पदाचे नाव - व्यवस्थापक
एकूण जागा – 17
शैक्षणिक पात्रता - CA/ CMA (ICWA)/ पदवीधर/ MBA / इंजिनिअरिंग पदवी, 4 वर्षांचा अनुभव


पदाचे नाव– अधिकारी
एकूण जागा – 19
शैक्षणिक पात्रता - M.Sc/ पदवीधर आणि 3 वर्षांचा अनुभव


अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अधिकृत वेबसाईट -  www.gailonline.com  (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये applying to gail वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातली जाहीरातीची लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


अर्ज कऱण्याची शेवटची तारीख – 5 ऑगस्ट 2021



महाराष्ट्र दूरसंचार विभाग


पदाचे नाव - वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, लोअर डिव्हिजन लिपिक आणि एमटीएस.


एकूण जागा – 33


नोकरीचं ठिकाण – गोवा, मुंबई


अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी आहे- cca.mhgoa@gmail.com


अधिकृत वेबसाईट - dot.gov.in


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021



पहा व्हिडीओ : JOB MAJHA : गेल (इंडिया) लिमिटेड आणि महाराष्ट्र दूरसंचार विभाग येथे नोकरीच्या संधी : जॉब माझा


 



संबंधित बातम्या :