नवी दिल्ली : अश्विनी वैष्णव यांनी नुकताच माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर यांनी स्वदेशी सोशल मीडिया अॅप कु (Koo) वर पहिली पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पहिल्या पोस्टमध्ये अश्विनी वैष्णव यांनी लिहिले की, नवीन आयटी नियम सोशल मीडिया यूजर्ससाठी सुरक्षित असतील. नवीन मार्गदर्शकतत्त्वे यूजर्सचे सक्षमीकरण आणि संरक्षण करत आहेत आणि भारतात एक सुरक्षित सोशल मीडिया निर्माण होईल.
Koo अॅपवरील आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “माझे सहकारी राजीव चंद्रशेखर यांच्यासोबत माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 च्या अंमलबजावणी व पालनाचा आढावा घेतला. ही मार्गदर्शक तत्वे यूजर्सचे सक्षमीकरण आणि संरक्षण करत आहेत आणि भारतातील सुरक्षित आणि जबाबदार सोशल मीडिया इकोसिस्टमची खात्री करतील. ”
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अश्विनी वैष्णव यांना माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळाली आहे. याआधी या मंत्रालयाची जबाबदारी भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्याकडे होती. अश्विनी वैष्णव यांनी 8 जुलै रोजी या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला.
पदभार स्वीकारताच आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला इशारा, म्हणाले..
माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारताच अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरला नवीन आयटी नियमांविषयी इशारा दिला होता. ट्विटरच्या मनमानीवर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना अश्विनी वैष्णव यांनी हे स्पष्ट केले होतं की देशाचा कायदा सर्वांसाठी समान आहे आणि प्रत्येकाने त्याचे पालन केले पाहिजे. त्यानंतर ट्विटरने विनय प्रकाश यांची भारतासाठी कंपनीचे तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :