नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण होणार आहे. खाजगी क्षेत्रात सर्वात जास्त नोकऱ्या देणारी आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टिसीएस (TCS) वर्ष 2021-2022 मध्ये 40 हजाराहून अधिक फ्रेशर्स लोकांना संधी देणार आहे. मागील वर्ष लॉकडाऊन असतानाही टिसीएसने 40 हजार लोकांची नोकर भरती केली आहे. यामुळे आता कंपनीत 5 लाखाहून अधिक कर्मचार्यांची संख्या झाल्याचे टिसीएसने सांगितलंय.
पाच लाखाहून अधिक कर्मचारी संख्या असलेल्या खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या टिसीएसने 2020 मध्ये कॅम्पसमधून 40 हजार पदवीधरांची नियुक्ती केली होती. या संख्येत यावर्षी अधिक भर घालणार असल्याचे कंपनीचे जागतिक एच आर प्रमुख मिलिंद लक्कड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले, की सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारी अनेक निर्बंध आहेत. मात्र, यामुळे नोकरी घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. गेल्या वर्षी एकूण 3 लाख 60 हजार फ्रेशर्सनी ऑनलाईन प्रवेश परीक्षा दिली आहे. “मागील वर्षी आम्ही भारतातल्या कॅम्पसमधून, 40 हजार पदवीधरांची निवड केली. आम्ही यावर्षी भारतातून 40 हजार किंवा त्यापेक्षा जास्त फ्रेशर्सला संधी देणार आहोत. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी अमेरिकन कॅम्पसमधून 2 हजार प्रशिक्षणार्थींवरही कंपनी चांगली कामगिरी करेल, असे त्यांनी सांगितले.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. गणपती सुब्रमण्यम म्हणाले की, देशात टॅलेंटची कोणतीही कमतरता भासत नाही. ते म्हणाले, की भारतीयांचे कौशल्य आणि कार्यसंस्कृती लक्षात घेता या प्रतिभेला “अभूतपूर्व” म्हटले पाहिजे.
कोरोनातही नोकर भरती
कोरोनामुळे जून 2020 महिन्यात संपलेल्या पहिल्या तिमाहीत टीसीएसच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. यानंतर देखील कंपनीने 40 हजार लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला. टीसीएसचे इव्हीपी आणि ग्लोबल एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, नव्याने सुरुवात करण्याच्या आमच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. भारतात आम्ही 40 हजार रोजगार दिले आहोत.
टीसीएस अमेरिकेतील इंजिनिअर बरोबरच टॉपच्या 10 बिझनेस स्कूलमधून पदवीधरांना भरती करून घेणार आहे. टीसीएस बिझनेस रोलसाठी फ्रेशर आणि अनुभवी लोकांना संधी देणार आहे. लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गोष्टी आमच्यासाठी नवी नाही. कंपनी 2014 पासून 20 हजारहून अधिक अमेरिकनची भरती केली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI