तपास यंत्रणांना जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरची एक व्हॉईस क्लीप मिळाली आहे. ज्यामध्ये अजहर त्याच्या संघटनेतील दहशतवाद्यांबाबत म्हणतो की, "काही लोक यांना दहशतवादी म्हणतील, काही लोक यांना रिकामटेकडे म्हणतील, काही लोक यांना मुर्ख म्हणतील, तर काही लोक यांना शांततेसाठी धोका असल्याचे म्हणतील. परंतु त्यांना सीमेपलीकडे जाऊद्या..."(मूळ उर्दू व्हॉईस क्लीप : कोई इन्हे दहशतगर्द कहेगा, कोई इन्हे निकम्मा कहेगा, कोई इन्हे पागल कहेगा, तो कोई लोक इन्हे अमन के लिये खत्रा कहेगा, बट लेट देम गो अॅन्ड डीस्रप्ट...अॅक्रॉस दी बॉर्डर)टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.
VIDEO | पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांना धास्ती, अनेकांनी बस्तान हलवलं | काश्मीर | एबीपी माझा
पुलवामा हल्ल्यानंतर भारत राजकीय आणि लष्करी पातळीवर पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी भारतीय तपास यंत्रणा पाकिस्तानविरोधातील तसेच तिथल्या दहशतवादी संघटनांसंबंधीचे पुरावे गोळा करत आहेत. या तपासादरम्यान मसूदची ही व्हॉईस क्पीप मिळाल्याचे बोलले जात आहे.