जिस्म की मौत कोई मौत नहीं होती है
जिस्म मिट जाने से इंसान नहीं मर जाते
धड़कनें रुकने से अरमान नहीं मर जाते
सांस थम जाने से एलान नहीं मर जाते
होंट जम जाने से फ़रमान नहीं मर जाते
जिस्म की मौत कोई मौत नहीं होती है
20 व्या शतकातील महान नेते विस्टन चर्चिल, फ्रान्सचे राष्ट्रपती चार्ल्स डी गॉल, रशियाचे जोसेफ स्टालिन, लोकप्रीय राष्ट्रपती जॉन एफ केनेडी, चीनचे हुकूमशहा माओत्से तुंग यांच्या तुलनेत बौद्धिक पातळीवर नेहरू नेहमीच श्रेष्ठ आहेत. त्यांचे इतिहासाचे ज्ञान आणि मानवतावादी प्रतिमा यांच्यापेक्षा मोठी आहे. नेहरू जरी देशाचे पंतप्रधान होते, तरीही त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच होते. 1951 साली राष्ट्रसंघाच्या परिषदेत त्यांनी दिलेल्या एका भाषणावरुन त्याचा प्रत्यय येतो.
"मी केवळ पंतप्रधान नाही, तर त्यापेक्षा अधिक आहे, मी माणूस आहे, कायम स्वतःत सुधारणा करण्यासाठी स्वतःशीच संघर्ष करत असतो, माणसांन कसं असायला हवं, याचाच विचार मी नेहमी करतो, यातून नेहरुंमधला माणुस आपल्याला पाहायला मिळतो".
नेहरुंच्या कार्यकाळात सुरु झालेल्या IIT, IIM, NID, अणूऊर्जा प्रकल्प, ISRO यामुळे जगभरात भारताची ओळख आहे. मात्र, राजकारणात त्यांच्यावर अनेकवेळा टीका झाली. आजही नेहरुंना टार्गेट केलं जातं. मात्र, त्यांनी हयात असताना सर्वांचे विचार ऐकून घेतले. या त्यांच्या व्यक्तीमत्वावर सरोजनी नायडू यांनी पत्रातून लिहिले होते की, ''तुम भाग्य पुरुष हो, जो भीड़ के बीच भी अकेला रहने के लिए जन्म लेता है. जिसे लोग बेहद प्यार करते हैं, लेकिन समझते कम लोग हैं.''
नेहरुंकडे असलेलं ज्ञान हीच त्यांची सर्वात मोठी ताकद होती. त्यांनी 'द डिस्कवरी ऑफ इंडिया', 'ग्लिमप्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' आणि बायोग्राफी 'टुवर्ड फ्रीडम' अशी पुस्तके लिहली. ते विद्वानांसाठी महापंडित, तत्वज्ञांसाठी महान तत्वज्ञ, शास्त्रज्ञानांसाठी कुशल शास्त्रज्ञ आणि साहित्य आणि राजकारणातील कुशल पंडित होते. नेहरू एक व्यक्ति नाही तर विचारांचा मेळा होता.
वैचारिक मतभेद -
देशाच्या स्वातंत्र्य लढाईत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नेहरुंची आधुनिक भारत निर्माण करण्यातही मोठं योगदान आहे. याकाळात आपल्याच सहकाऱ्यांसोबत त्यांचे अनेकदा वैचारिक मतभेद झाले. महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासह अनेकांसोबत नेहरुंचे विचार पटले नाहीत. मात्र, याचा परिणाम कधीच त्यांच्या वैयक्तीक नात्यावर झाला नाही.
स्वतः विरोधात लिहला लेख -
एकदा नेहरू त्यांचा जयजयकार ऐकून इतके कंटाळले होते, की 195 7 मध्ये त्यांनी स्वत:च्या विरुद्ध मॉडर्न टाइम्समध्ये 'द राष्ट्राध्यक्ष' या नावाने एक जबरदस्त लेख लिहिला. या लेखात त्यांनी नेहरूंच्या हुकूमशाही प्रवृत्तीविरूद्ध वाचकांना इशारा दिला. ते म्हणाले, नेहरुंना इतकंही बळ देऊ नका, की त्यांचा सीझर होईल. जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा नेहरुंसमोर अनेक आव्हाने होती. ते काहींमध्ये अपयशी ठरले. परंतु, त्यांचा उद्देश देशाच्या प्रगतीबद्दल नेहमीच प्रामाणिक होता.