भारत : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) जपानला (Japan) त्यांच्या चांद्रयानाच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि रशियानंतर (Russia) जपानने देखील त्यांची चांद्रमोहीम हाती घेतील. तर जपानच्या चांद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण देखील झाले. इस्रोने यावेळी ट्विट करत जपानच्या अंतराळ संस्थेला शुभेच्छा दिल्या आहेत. इस्रोने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, चांद्रयानाच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी जपानचे अभिनंदन. जागतिक अंतराळच्या क्षेत्रासाठी हा खूप मोठा अभिमानाचा क्षण आहे. आम्ही जपानच्या संपूर्ण अंतराळ संस्थेच्या टीमचं अभिनंदन करत आहोत. 







गुरुवार 7 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजून 42 मिनिटांनी जपानने त्यांचे एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) आणि  स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) या चांद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण केले. जपानच्या तानेगाशिमा अंतराळ संस्थेतून या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. व्हीकल क्रमांक 47 (H-IIA F47)च्या माध्यमातून हे यान प्रक्षेपित झाले. 


सर्व काही योजनेनुसार - जपान


यावर माहिती देताना जपानच्या अंतराळ संस्थेने म्हटलं आहे की, प्रक्षेपण हे व्यवस्थितपणे आणि योजनेनुसार झाले. लाँच व्हेईकल द्वारे योग्य वेळेत यान प्रक्षेपित करण्यात आले. प्रक्षेपणानंतर  14 मिनिटे 9 सेकंदांनी XRISM लाँच व्हेइकलपासून वेगळे झाले. त्यानंतर जवळपास 47 मिनिटे 33 सेकंदांनी  SLIM देखील यशस्वी रित्या वेगळे करण्यात आले. यावेळी जपानच्या अंतराळ संस्थेने त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे देखील अभिनंदन केले आहे. 






भारत आणि रशियानंतर जपानची चांद्रमोहीम 


भारताने 14 जुलै रोजी चांद्रयान -3 प्रक्षेपित केले. त्यानंतर रशियाने 10 ऑगस्ट रोजी त्यांचे चंद्रयान चंद्रावर पाठवले. पण चंद्रावर उतरण्याआधीच रशिया चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले. तर भारताचे चांद्रयान हे त्यांच्या नियोजित वेळेत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झाले. त्यामुळे आता जपानचे यान देखील यशस्वीरित्या चंद्रावर उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर जपानच्या या मोहीमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष आता लागून राहिलं  आहे. 


हेही वाचा : 


Aditya L1 Mission: आदित्य एल1 नं ISRO ला पाठवलाय सेल्फी; पृथ्वी अन् चंद्राचे फोटोही केलेत क्लिक