जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) सांबा जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात (Road Accident) झाल्याची बातमी समोर येत आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती देताना सांबा जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी सागितले की, शनिवारी पहाटे मनसर परिसरात झालेल्या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.


श्रीनगर येथे जात होते 6 लोक 


त्यांनी सांगितले की, सांबा जिल्ह्यातून एक कार (क्रमांक JK01U-2233) मनसर मार्गे श्रीनगरला जात होती. दरम्यान, जामोद परिसरात भरधाव वळणावर कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार खोल दरीत कोसळली. कारमध्ये 6 जण होते. त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी व स्थानिक लोकांनी कसे तरी दरीत पडलेल्या कारमधून सर्व लोकांना बाहेर काढून मुख्य रस्त्यावर आणले आणि पोलिसांना या अपघाताची माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी सर्व रुग्णांना रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी 6 पैकी 5 जणांना मृत घोषित केले.






अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून जखमींना पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळावी यासाठी सध्या प्रत्येकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: