jammu kashmir police : जम्मू आणि काश्मीर पोलिसांना लवकरच अत्याधुनिक 'झेन शूटएज' कॉर्नर शॉट पिस्तूल मिळणार आहेत. पिस्तूल पुरवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिल्या टप्यात  100  झेन शूटएज' कॉर्नर शॉट पिस्तूल जम्मू आणि काश्मीर पोलीसांना पुरवण्यात येणार आहेत. हे पिस्तूल वापरणारी व्यक्ती लपून आणि भिंतीवरून देखील गोळ्या झाडू शकते.  


याबाबत माहिती देताना सुरक्षा अधिकार्‍यांनी सांगितले की, " जम्मू आणि काश्मीर पोलिसांना मिळणारे हे आधुनिक शस्त्र दहशतवादविरोधी मोहिमेमधील पथकातील सैनिकांचे गोळीबारापासून संरक्षण करेल.  


झेन टेक्नॉलॉजीजचे वरिष्ठ व्यवस्थापक सेल्स बलजीत सिंग यांनी सांगितले की, अलीकडेच जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आमच्याकडून अशा 100 पिस्तुलांची खरेदीसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. झेन टेक्नॉलॉजीजने आयोजित केलेल्या दोन दिवसीय नॉर्दर्न टेक सिम्पोजियममध्ये शस्त्र प्रणालीचे प्रदर्शन नुकतेच पार पडले.  


"येत्या दोन-तीन महिन्यांत झेन शूटएज' कॉर्नर शॉट पिस्तूल पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे बलजितसिंग सिंग यांनी सांगितले.  झेन शूटएज' कॉर्नर शॉट पिस्तूल बनवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की 'शूटएज' पिस्तूल अंधारात आणि कमी प्रकाशात अचूक लक्ष्य टिपण्यास मदत करते. शिवाय उभे राहताना आणि गुडघे टेकताना याचा वापरता अगदी सहतेने करता येतो. कठिण परिस्थिती देखील अगदी सहज गोळीबार करण्यास झेन शूटएज' कॉर्नर शॉट पिस्तूल सक्षम आहे. 


क्लोज कॉम्बॅट किंवा गुप्त ऑपरेशन्ससाठी दरम्यान ग्लॉक 17, ग्लॉक 19 किंवा 9 मिमी ब्राउनिंग सारख्या पिस्तूलमध्ये हे अत्याधुननिक शस्त्र बसवता येते. 1993 पासून झेन टेक्नोलॉजीज लिमिटेड (Zen Technologies Limited ) जगभरातील संरक्षण आणि सुरक्षा दलांसाठी अत्याधुनिक युद्ध प्रशिक्षण आणि ड्रोनविरोधी उपकरणे विकसित आणि तयार करते. 


महत्वाच्या बातम्या


BSF : पाकिस्तानचा नापाक कट पुन्हा एकदा फसला, अमृतसरमध्ये हेरॉईन नेणारा ड्रोन BSF जवानांनी पाडला


Himachal Khalistan Banners : खालिस्तानी झेंडे प्रकरणी गुन्हा दाखल, आरोपींना पकडण्यासाठी सीमा बंद