Pakistan Drone : बीएसएफने पुन्हा एकदा पाकिस्तानचा नापाक कट उधळून लावला आहे. बीएसएफच्या जवानांनी अमृतसरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून येणारे ड्रोन जमिनीवर पाडले आहे. ड्रोनमधून एक बॅग जप्त करण्यात आली असून त्यात सुमारे 11 किलो हेरॉईन असल्याचे सांगण्यात येत आहे.


बीएसएफच्या जवानांनी या ड्रोनवर 8 गोळ्या झाडल्या


याआधी शनिवारी पाकिस्तानच्या ड्रोनने जम्मूच्या सीमा भागात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. बीएसएफच्या जवानांनी या ड्रोनवर गोळीबार केला, त्यानंतर हे ड्रोन पाकिस्तानी सीमेवर परतले. शनिवारी संध्याकाळी 7.25 च्या सुमारास आरएस पुरा उपविभागातील अरनिया परिसरात हा ड्रोन अचानक दिसला. हा ड्रोन दिसताच सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी या ड्रोनवर 8 गोळ्या झाडल्या. हे ड्रोन भारतीय हद्दीत घुसताच बीएसएफच्या जवानांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. या घटनेनंतर बीएसएफच्या जवानांनी सीमेवर शोधमोहीम सुरू केली. अशा ड्रोनचा वापर पाकिस्तानकडून भारतीय सीमा भागात शस्त्रास्त्रे किंवा अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी केला जात असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळ गाठून याचा तपास केला.


भारतीय सीमेवर सध्या पाकिस्तान ड्रोनची एन्ट्री


सुत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या भारतीय सीमेवर सध्या ड्रोनची एन्ट्री होताना दिसत आहे. 29 एप्रिल रोजी पंजाबच्या अमृतसर सेक्टरमध्ये पाकिस्तानातून येणारे ड्रोन पाडण्यात आले होते. बीएसएफ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतसर सेक्टरमधील धानो कलान गावाजवळील भागात मध्यरात्री 1:15 च्या सुमारास ड्रोन भारतीय हद्दीत घुसले होते. अशी माहिती बीएसएफ जवानांकडून देण्यात आली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या