जम्मू : मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने जम्मू काश्मीरचे उप-राज्यपाल मनोज सिन्हा यांचं अधिकृत ट्विटर हॅण्डल सोमवारी (10 मे) सस्पेंड केलं होतं. कोरोना संकटाच्या काळात मनोज सिन्हा आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन महत्त्वाच्या घोषणा आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती देत होते.


दरम्यान राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी हा मुद्दा संबंधित अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. त्यानंतर तांत्रिक त्रुटी लवकरच दूर केल्या जातील असं आश्वासन त्यांना देण्यात आलं. मग काही काळाने त्यांचं अकाऊंट पुन्हा सुरु करण्यात आलं.


सस्पेंड होण्याआधी त्यांच्या हॅण्डलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. @OfficeOfLGJandK या हॅण्डलवरुन मनोज सिन्हा यांनी कोरोनाविषयक नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत होते. परंतु रात्री 6.52 वाजता त्यांचं हॅण्डल पाहिलं असता त्यावर सस्पेंडेड असं दिसत होतं. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अकाऊंट सस्पेंड केल्याचा मेसेज त्यावर होता.


सध्याच्या घडीला ट्विटर हे सोशल मीडियावरील एक प्रभावी प्लॅटफॉर्म बनला आहे, जिथे मोठ्या व्यक्तिमत्त्वांसह राजकीय नेते, कलाकार यांच्यापासून सर्वसामान्यांचा वावर आहे. मागील काही दिवसात ट्विटरने आपल्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. तर काही नियम आणखी कठोर केले आहेत.
 
ट्विटरकडून कंगना रनौतचं अकाऊंट बंद 
याआधी ट्विटरने 'द्वेषयुक्त वर्तन आणि आlatest Marathi breaking newणि अपमानास्पद वागणूक' या धोरणाचं उल्लंघन केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौतचंही ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी सस्पेंड केलं होतं. ट्विटरने मागील आठवड्यात मंगळवारी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. कंगना रनौत आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन  सातत्याने प्रक्षोभक ट्वीट करत होती.


तिने पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा विजय आणि निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराबाबत अनेक ट्वीट केले होते. तसंच ममता बॅनर्जी यांना हिंसाचारासाठी जबाबदार असल्याचं सांगत राज्यात राष्ट्रपती राजवटीचीही मागणी केली होती. तसंच ममता बॅनर्जी यांचा आक्षेपार्ह शब्दात उल्लेख केला होता. यानंतर ट्विटरने कंगनाच्या ट्विटर हॅण्डलवर कठोर कारवाई करण्याचं आपल्या परिपत्रकात म्हटलं होतं.


ट्विटर प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, "ट्विटरच्या नियमांचं विशेषत: 'द्वेषयुक्त वर्तन आणि आणि अपमानास्पद वागणूक' या धोरणाचं वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी आम्ही संबंधित अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे. आम्ही ट्विटरचे नियम सर्वांसाठी योग्य आणि निष्पक्ष पद्धतीने लागू करतो.