Mehbooba Mufti In Temple : जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी नवग्रह मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी पूजा-अर्चना केली. यावेळी त्यांनी शिवलिंगाला जलाभिषेक केला. यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने ही नौटंकी असल्याचे म्हटले आहे. तर मुफ्ती म्हणाल्या यावर वाद घालण्यासारखे काय आहे. दरम्यान, नवग्रह मंदिराता मेहबुबा मुफ्ती यांनी शिवलिंगावर जलाभिषेक केला. त्यानंतर मंदिराला प्रदर्शना घातली. यावरुन राजकीय चर्चा तर सुरु झालीच पण सोशल मीडियातही नेटकरी चर्चा करत आहेत. अच्छे दिन आले वाटतेय, अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली. हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे, यावरुन वाद व्हायला नको, असे मुफ्ती म्हणाल्या. 
 
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पुँछ (Poonch) येथील नवग्रह मंदिरात (Navgrah Temple) भेट दिली. यावेळी मुफ्ती यांनी शिवलिंगाचं दर्शन घेत जलाभिषेक केला. यावेळी त्यांनी शिवलिंगासमोरही डोकं टेकवलं. त्यानंतर मुफ्ती यांच्यावर मुस्लीम धर्मगुरु आणि भाजपने टीका केली. या टीकेला मुफ्ती यांनी प्रत्युत्तर दिलं.  मला आपला धर्म चांगला माहिती आहे. हा माझा वैयक्तिक विषय आहे, यावरुन वाद व्हायला नको, असं त्यांनी सुनावलं. 
 
मेहबुबा मुफ्ती नाटक आणि नौटंकी करत असल्याची टीका यानंतर भाजपने केली. तर उत्तर प्रदेशमधील देवबंद म्हणाले की, मेहबुबा मुफ्ती यांनी जे केलं त्यासाठी इस्लाममध्ये परवानगी नाही असं म्हटलं आहे. इत्तेहाद उलेमा-ए-हिंद चे मुफ्ती असद कासमी यांनीही मुफ्तींची ही कृती गैर मुस्लिम असल्याचे म्हटलेय.


'आपला देश हा धर्मनिरपेक्ष आहे. मी सर्व धर्मांचा आदर करते. आमचे दिवंगत नेते यशपाल शर्मा यांनी बांधलेल्या मंदिराला भेट दिली. हे एक सुंदर मंदिर आहे. मी मंदिरात जाऊन पाहावे अशी तेथील श्रद्धाळूंची इच्छा होती. तिथे कोणीतरी माझ्या हातात पाण्याचे भांडे श्रद्धेने दिले.  म्हणून मी ते ओतले. हा माझा वैयक्तिक विषय आहे, यावरुन वाद नको, असे मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.' दरम्यान, 2017 मध्ये मुख्यमंत्री असताना मुफ्ती गांदरबल येथील भवानी मंदिरात गेल्या होत्या.