Jammu Kashmir Pulwama Encounter : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, तर एक जवान जखमी झाला. पोलिसांनी सांगितले की, कुलगाममधील खांडीपुरा भागात एक दहशतवादी लपून बसला असल्याच्या गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली.


लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार सुरू


या शोध मोहिमेदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्याने सुरक्षा दलांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला आणि सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरात दहशतवादी मारला गेला. माहितीनुसार, सुरक्षा दलांनी प्रथम चकमकीच्या ठिकाणाहून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. पोलिस म्हणाले की, चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख रसिक अहमद गनी असे आहे, जो बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे आणि तो कुलगामचा रहिवासी आहे, ज्याचा मृतदेह चकमकीच्या ठिकाणी सापडला आहे.


दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त


पोलिसांनी सांगितले की, मारला गेलेला दहशतवादी पोलिस आणि इतर सुरक्षा दलांवरील हल्ल्यांसह अनेक दहशतवादी घटनांमध्ये सामील होता. चकमकीच्या ठिकाणाहून एक .303 रायफल, आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा, 23 काडतुसे, एक पिस्तूल, आणि एक हातबॉम्ब जप्त करण्यात आला.


चकमकीत एक जवान जखमी


माहितीनुसार, जप्त केलेल्या सर्व वस्तू पुढील तपासासाठी केस रेकॉर्डमध्ये घेण्यात आल्या आहेत. या चकमकीत एक जवानही जखमी झाल्याचे लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. जखमी जवानाला येथील लष्कराच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जेथे त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला. प्रवक्त्याने सांगितले की, जिल्ह्यातील द्राबगाम भागात ही चकमक झाली ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला आणि ऑपरेशन अजूनही सुरू आहे.ठिकाणाहून एक .303 रायफल, आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा, 23 काडतुसे, एक पिस्तूल आणि 31 काडतुसे आणि एक हातबॉम्ब जप्त करण्यात आला.