Terrorists Search Operation : जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मध्ये सध्या तणाव कायम आहे. लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी शोधमोहिम हाती घेतली आहे. सोमवारी जम्मूतील राजौरी जिल्ह्यामध्ये (Rajouri district) सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) चकमक झाली. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील कालाकोट (Kalakote) येथे शोध मोहिमेदरम्यान (Terrorist Search Operation) सुरक्षा दल (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) रात्री उशिरा चकमक झाली. 


जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक


जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील कालाकोटच्या जंगल परिसरात शोध मोहिमेदरम्यान सोमवारी (02 ऑक्टोबर) संध्याकाळी उशिरा दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. जम्मू-काश्मीरमधील राजौरीच्या जंगलात दहशतवादी लपल्याच्या संशयावरून सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर या दहशतवाद्यांनी गोळी केल्यानंतर सुरक्षा दलाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये 9 पॅरा कमांडो स्पेशल युनिटचे 3 जवान जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.


दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार


पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संशयास्पद हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर लष्कराने सोमवारी पहाटे कालाकोट भागातील ब्रोह आणि सूम जंगल परिसराला वेढा घातला होता. दहशतवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान संध्याकाळी परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गराडा तोडण्याच्या प्रयत्नात सैन्यावर गोळीबार सुरू केला आणि याचं रुपांतर चकमकीत झालं.


महत्वाच्या इतर बातम्या :