जम्मू : जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांनी मोठी कारवाई केली आहे. शोपियान जिल्ह्यात सुरु असलेल्या चकमकीत भारतीय जवानांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.
भारतीय जवानांनी केलेल्या या कारवाईत सहा पैकी चार दहशतवाद्यांचा मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तर एका दहशतवाद्याचा मृतदेह अजून मिळालेला नाही. तसेच एक दहशतवादी जखमी असून तो सतत गोळीबार करत असल्याची माहिती मिळत आहे. अद्यापही येथे चकमक सुरु असल्याचे सुत्रांकडून कळते.
या कारवाईत घटनास्थळावरुन चार एके 47 रायफल हस्तगत केरण्यात आल्या आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात केलायं. गेल्या 72 तासांत झालेल्या चकमकीत लष्कर आणि हिजबुलच्या अतिरेक्यांचा मृत्यू झाला आहे.
जानेवारी 2018 पासून आतापर्यंत 240 अतिरेक्यांचा खात्मा सुरक्षा दलांनी केला आहे. यापैकी बहुतेक अतिरेकी शोपियान जिल्ह्यात मारले गेले आहेत.
यापूर्वी शुक्रवारी जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये ऑपरेशन ऑलआऊटअंतर्गत बिजबेहरामध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं.
काश्मीरमध्ये गेल्या 48 तासांत 12 दहशतवाद्यांचा खात्मा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Nov 2018 01:01 PM (IST)
जानेवारी 2018 पासून आतापर्यंत 240 अतिरेक्यांचा खात्मा सुरक्षा दलांनी केला आहे. यापैकी बहुतेक अतिरेकी शोपियान जिल्ह्यात मारले गेले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -