अयोध्या : अयोध्येत प्रभू श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की, अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर रामाचा 151 फूट उंची असलेला पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी 5 शिल्पकारांनी रामाच्या मूर्तीच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. त्यापैकी शिल्पकार राम सुतार यांनी साकारलेल्या रामाच्या प्रतिकृतींची योगींनी निवड केली आहे.


गुजरातमधील नर्मदा नदीच्या तिरावर सरदार वल्लभ भाई पटेल यांचा 182 मीटर इतकी उंची असलेला पुतळा उभारण्यात आला आहे. 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा राम सुतार यांनीच साकारला होता. आता राम सुतार अयोध्येत उभारला जाणारा रामाचा पुतळा साकारणार आहेत.

एकीकडे शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमांमुळे अयोध्येमध्ये राम मंदिराचा मुद्दा तापलेला आहे. दुसरीकडे काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही यात भर घातली. अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर उभारल्या जाणाऱ्या रामाच्या पुतळ्याबाबत योगींनी अंतिम निर्णय घेतला आहे. 151 फूट उंच रामाची मूर्ती कुठल्या रुपातली असणार हे त्यांनी ठरवले. राम सुतार यांनी साकारलेल्या मूर्तीच्या मॉडेलवर योगींनी शिकामोर्तब केले.


हे वाचा : 

सरदार पटेलांचा पुतळा पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी

स्टॅच्यू ऑफ युनिटीसारखाच रामाचा भव्य पुतळा अयोध्येत उभा राहणार?

सरदार पटेलांनंतर आता अयोध्येत रामाचा पुतळा | नवी दिल्ली | एबीपी माझा