Pantha Chowk Terrorist Attack : जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये काश्मिर पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. या घटनेत 14 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या उपचार सुरू आहेत.  काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


काश्मिर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका एएआयच्या आणि एक सिलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये गुलाम हसन, सजाद अहमद, बिशम्बर दास, संजय कुमार, विकास शर्मा, अब्दुल मजीद, मुदस्सिर अहमद, रविकांत, शौकत अली, अर्शिद मोहम्मद, शफीक अली, सतवीर शर्मा आणि आदिल अली जखमी झाले आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्यांकाळी साधारण 5.30 च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या  दहशतवाद्यांनी  पोलिसांच्या बसवर हल्ला केला. या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर टायगर्स या संघटनेने घेतली आहे. या संघटनेचे नाव पहिल्यांदाचा समोर आले आहे. ही संघटना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी जोडला असल्याची माहिती समोर आली आहे.


गेल्या काही दिवसात जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 10 डिसेंबला जम्मू काश्मिरच्या बांदीपोराच्या गुलशन चौकात एका पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात मोहम्मद सुल्तान आणि फैयाज अहमद हे शहीद झाले. 


 पुलवामासारखाच हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने 2 डिसेंबरला खात्मा केला. या हल्ल्यासाठी बेकायदेशीरपणे 40 किलोपेक्षा जास्त स्फोटके जमवली होती. शिवाय हे दान्ही दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये निष्पाप लोकांनाही लक्ष्य बनविण्याच्या तयारीत होते.



इतर महत्त्वाच्या बातम्या: