Srinagar Encounter : जम्मू- काश्मिरमधील श्रीनगरमधील हैदरपुरा येथे  सुरक्षा दलाच्या जवानांना मोठी कामगिरी केली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. कश्मिर झोनच्या पोलिसांनी ट्विट करत सांगितले की, चकमकीत एका अज्ञात दहशतवाद्याला ठार मारण्यात आले. ऑपरेशन  सध्या सुरू आहे.


या अगोदर गुरुवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन आतंकवाद्यांचा खात्मा केला . या अगोदर सुरक्षा बलाने 130 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार केले आहे. सध्या काश्मिरच्या खोऱ्यात 38 विदेशींसह 150-200 दहशतवादी सध्या सक्रिय आहे.






जम्मू काश्मिरमध्ये गेल्या काही दिवसात दहशतवादी हल्ल्याच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. 8 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी एक सेल्समनची हत्या केली. त्यापूर्वी एक दिवस अगोदर 7 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी एका कॉन्स्टेबलची होळी मारुन हत्या केली. तर ऑक्टोबर महिन्यात 13 नागरिकांची हत्या करण्यात आली. यामध्ये बिझनेसमॅन, कामगार आणि शिक्षकांचा सहभाग आहे. तर ऑक्टोबर महिन्यात 12 जवान देखील शहीद झाले.  तर सुरक्षा दलाने 20 दहशतवाद्यांना ठार केले. 


नव्वदच्या दशकात दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे पळून गेलेल्या काश्मिरी पंडितांच्या या भागातील पुर्नवसनासाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यांच्यासाठी विशेष पॅकेज तयार करुन सरकारी नोकरीही देण्यात आली. पण अलिकडच्या काही घटनांवरुन असं लक्षात येतंय की पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांनी लक्ष्य केलं आहे, त्यांना ठार मारलं जात आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत या ठिकाणी 25 काश्मिरी नागरिकांची हत्या करण्यात आली आहे.


संबंधित बातम्या :


Jammu Kashmir News: जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांकडून सेल्समनची हत्या, 24 तासातील दुसरी घटना