श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी भाजपच्या प्रदेश सचिव आणि बीडीसी अध्यक्षपदी असणाऱ्या फरीदा खान यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. डाकबंगला येथे बैठक सुरु असतेवेळीच दहशतवाद्यांनी हल्ला केला. या घटनेमध्ये अनेकजण जखमी झाले. 


हल्ल्यानंतर जखमींना तातडीनं उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. जिथं त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. माध्यमांच्या हाती हे वृत्त येईपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली नव्हती. सुत्रांच्या माहितीनुसार दहशतवादी हल्ला करुन पळ काढण्यात यशस्वी ठरले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी इथं गर्दी केली. तर, पोलीस यंत्रणा, लष्करानंही तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. 


हवाई दलाची ताकद आणखी वाढणार, 10 राफेल विमानं लवकरच भारतात दाखल होणार


सदर घटनेनंतर या भागात सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहिम हाती घेतली आहे. हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार काश्मीरमधील सोपोर भागातील एका इमारतीत सोमवारी विश्लेषकांची बैठक होती. बैठक सुरु असतानाच दहशतवादी तिथं पोहोचले आणि त्यांनी हल्ला केला. हा हल्ला परतवून लावण्यासाठी तिथं असणाऱ्या पोलीस दलातील पीएसओंनी प्रयत्न केला. पण, दहशतवाद्यांनी त्यांना जखमी केलं.