Jammu & Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी राज्यभर हाय अलर्ट जाहीर केला आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत आहे. या कटात खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी, रेल्वे मालमत्तेवर हल्ला, काश्मिरी पंडित आणि बिगर काश्मिरी नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुप्तचर माहितीच्या आधारे, जम्मू-काश्मीरच्या उत्तर, मध्य आणि दक्षिण भागात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. विशेषत: राजौरी, पुंछ, डोडा, किश्तवार, सुंदरबनी, नौशेरा, लांबेरी, अखनूर आणि डोमाना या संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. सुरक्षा दलांना सतर्क राहण्याच्या आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
पाककडून पुन्हा नापाक षडयंत्र
पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत आहे. या कटात खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी, रेल्वे मालमत्तेवर हल्ला, काश्मिरी पंडित आणि बिगर काश्मिरी नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या कानाकोपऱ्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सुरक्षा दलाचं नागरिकांना आवाहन
ISI सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील तरुणांना दहशतवादाकडे भडकवण्याचा प्रयत्न करत सुरु असल्याचे देखील समजते. याशिवाय आयएसआयने जमात-ए-इस्लामीच्या नेत्यांना लक्ष्य करण्याची योजना आखली आहे. ड्रोन कारवायांमध्येही वाढ झाली आहे. तर सुरक्षा दलांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती स्थानिक पोलीस किंवा सुरक्षा दलांना त्वरित कळवा. तसेच, सोशल मीडियावर कोणतीही दिशाभूल करणारी किंवा प्रक्षोभक सामग्री शेअर करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू
दरम्यान, मंगळवार दि. 22 एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील हा सर्वात घातक हल्ला होता. पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या संलग्न असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या