Deepika from Maharashtra on Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघा देश सुन्न होऊन गेला आहे. ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना घेऊन अंदाधुंद गोळीबार करत 26 जणांचा प्राण घेतला. त्यानंतर अवघ्या देशभरामध्ये संतापाची लाट पसरली आहे. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला माफ न करता थेट पाकिस्तानचे दोन तुकडे करून काश्मीर ताब्यात घ्यावं अशी सुद्धा मागणी देशभरातून केली जात आहे. दरम्यान, काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम बाजूला व्हा या दहशतवाद्यांच्या भूमिकेवरून देशांमध्ये सुद्धा वेगवेगळी वक्तव्य केली जात आहेत. यावरून 'धर्म पुछा, जाति नही' असा सुद्धा प्रचार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काश्मीरमधील प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या प्रकाराने द्वेषाच्या प्रचाराला उत्तर दिलं गेलं आहे.
पण मुस्लीम फॅमिलीने साथ सोडली नाही
दरम्यान, पर्यटकांना नसलेल्या सुरक्षेवरून अनेक पर्यटकांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रामध्ये परतलेल्या दीपिकाने मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंगावर शहारे आणणारा प्रसंग सांगितला. दीपिकाने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, दहशतवादी आर्मी किंवा पोलिसांच्या वेशामध्ये समोर आल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम बाजूला व्हा असे सांगत होते. मात्र, त्यावेळी बाजूलाच एक मुस्लिम फॅमिली मॅगी खात होती. सर्वांना नाव विचारण्याचा प्रयत्न केला पण कोणीच नाव सांगितलं नाही. मॅगी खात असलेलं कुटुंब दहशतवाद्यांनी सांगितल्यानंतर कोणीच बाजूला झालं नाही. त्यांनी साथ सोडली नाही. यानंतर सर्वांनाच दहशतवाद्यांनी मारून टाकल्याचा हृदयद्रावक प्रसंग दीपकाने सांगितला. यावेळी दीपिकाला अश्रू अनावर झाले.
दुसरीकडे, अनेक पर्यटकांनी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताना हजारो पर्यटक असताना तिथं असताना एकही सुरक्षा रक्षक तैनात नसण्याकडे लक्ष वेधले. सुरक्षा तैनात असती तर हा हल्ला झाला नसता अशी प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक स्थानिक मुस्लिम कुटुंबांनी, ड्रायव्हर आणि घोडेस्वारांनी केलेल्या मदतीचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. स्थानिक नसते तर हजारो जणांचे बचाव कार्य शक्य झालं नसतं असेही प्रत्यक्षदर्शी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या