Terrorist Encounter : उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला (Baramulla) जिल्ह्यातील येडीपोरा पट्टणमध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. अजूनही एक ते दोन दहशतवादी या परिसरात लपून बसल्याचा संशय आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे. तर दुसरीकडे शोपियानच्या चित्रागाम भागात दुपारी 2 च्या सुमारास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू झालेली चकमक आता संपली आहे. येथील रहिवासी भागात लपलेले दहशतवादी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, तरीही सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली.


 






दहशतवाद्यांचा खात्मा


बारामुल्ला चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप समोर आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे लपलेले सर्व दहशतवादी स्थानिक असल्याचे सांगण्यात येत आहे. चकमकीदरम्यान, दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची अनेक संधी देण्यात आली, परंतु जेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू ठेवला, तेव्हा सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दहशतवाद्यांचा खात्मा केला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोपियान आणि बारामुल्लामध्ये रात्री शोध मोहीम सुरू केली. दोन्ही भागात तीन ते चार दहशतवादी असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. शोपियानमध्ये गोळीबार थांबला आहे, तर बारामुल्लामध्ये अजूनही दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी सुरक्षा दल प्रयत्न करत आहेत. स्थानिक मौलवींच्या मदतीने दहशतवाद्यांना शस्त्र खाली ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.


दोन ते तीन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी
पोलिसांनी सांगितले की, आज पहाटे मिळालेल्या माहितीच्या आधारे, एसओजी, आर्मी आणि सीआरपीएफच्या दोन वेगवेगळ्या पथकांनी शोपियान जिल्ह्यातील चित्रगाम आणि बारामुल्ला येथील येडीपोरा पट्टण येथे दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा जवान तळांजवळ पोहोचताच तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. पोलिस सूत्रांनी सांगितले की, शोपियानमध्ये दुपारी दोनच्या सुमारास चकमक सुरू झाली. रात्रभर दोन्ही बाजूंकडून अधूनमधून गोळीबार सुरू होता, पण सूर्योदय होईपर्यंत दहशतवाद्यांचा गोळीबार थांबला. सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली असता, अंधाराचा फायदा घेत दहशतवादी चकमकीच्या ठिकाणाहून पळून गेल्याचे आढळून आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, निवासी भागात लपलेले दोन ते तीन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते, परंतु त्यांनी परिसराला वेढा घालून दहशतवाद्यांचा शोध सुरू ठेवला आहे. या भागात अजूनही दहशतवादी असल्याचा त्यांना संशय आहे. सध्या शोधमोहीम सुरू आहे