ITBP Bus Accident : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. 39 जवानांना चंदनवाडीवरुन पहलगामला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. ITBP जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, त्यामुळे हा अपघात झाला. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले होते. अमरनाथ यात्रा संपल्यानंतर जवान परतत होते. त्याचदरम्यान हा अपघात झाला असून बचावकार्य सुरू आहे. या अपघातात 4 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 


जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये आयटीबीपीच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला मोठा अपघात झाला आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, 39 जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली असून आतापर्यंत चार जवांनाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चंदनवाडीवरुन पहलगामला जात असताना ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.



बचावकार्य सुरु


अपघात झालेल्या बसमध्ये 39 जवान होते. ज्यामध्ये ITBP चे 37 जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे 2 जवानांचा समावेश होता. बसचे ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस खोल दरीत कोसळली, अशी माहिती मिळत आहे. सर्व जवान चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. या अपघातात मोठ्या संख्येनं जवान जखमी होण्याची भीती आहे. बचावकार्य सुरु करण्यात आलं असून आतापर्यंत 4 जवांनांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.