NISAR Satellite Ready To Launch : भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच, इस्त्रो (ISRO) आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) यांच्याकडून संयुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. इस्त्रो आणि नासा यांच्याकडून निसार सॅटेलाईट (NISAR Satellite) तयार करण्यात येत आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सध्या नासाकडून हे सॅटेलाईट तयार करण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कामासाठी हे सॅटेलाईट भारतात दाखल होईल. नासाकडून सॅटेलाईट भारतात पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. फ्रेबुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत निसार सॅटेलाईट भारतात दाखल होईल.


इस्त्रो आणि नासा यांची संयुक्त मोहीम


निसार उपग्रह बनवण्याची इस्त्रो आणि नासा यांची संयुक्त मोहिम आहे. हा उपग्रह पृथ्वीवरील जमीन आणि बर्फाच्छादित प्रदेश यांबाबतची अधिक माहिती मिळवण्यात मदत करेल. हे सॅटेलाईट याचं अधिक खोल आणि विस्तृत निरीक्षण करेल. लवकरच निसार सॅटेलाईट भारतात दाखल होईल. सॅटेलाईट भारतात पाठवण्याआधी त्याच्या काही चाचण्या केल्या जातील. इस्त्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या देखरेखीखाली काही चाचण्या पार पडतील. यासाठी इस्त्रोचे अध्यक्ष 3 फेब्रुवारी रोजी कॅलिफोर्नियामध्ये दाखल झाले आहेत.




2014 मध्ये झाला होता करार


कॅलिफोर्नियामधील नासाच्या जेट प्रोपल्जन लॅबमध्ये (JPL) सॅटेलाईट भारतात रवाना करण्यापूर्वी परीक्षण करण्यात येत आहे. नासाकडून सॅटेलाईट भारतात पाठवण्याची तयारी सुरू आहे. निसार उपग्रह पृथ्वीवरील जमीन आणि बर्फाच्छादित प्रदेशाबाबत अधिक माहिती मिळवण्यात मदत करेल. इस्त्रो आणि नासा यांच्यामध्ये 2014 मध्ये 2,800 किलो वजनी उपग्रह बनवण्याचा करार झाला होता.


जेट प्रोपल्जन लॅबमध्ये (JPL) आयोजित एका कार्यक्रमात एस. सोमनाथ म्हणाले की, "इस्त्रो आणि नासाची ही संयुक्त मोहीम एक वैज्ञानिक साधन म्हणून रडारच्या क्षमतेचे एक शक्तिशाली प्रात्यक्षिक असेल. यामुळे पृथ्वीच्या गतिमान जमीन आणि बर्फाच्या पृष्ठभागाचा पूर्वीपेक्षा अधिक तपशीलवार अभ्यास करण्यास मदत होईल." या कार्यक्रमाला इस्त्रो आणि नासा या दोन्ही अंतराळ संस्थांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते. 


फेब्रुवारी महिन्यात निसार उपग्रह भारतात पोहोचणार


निसार उपग्रह फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भारतात दाखल होईल. निसार उपग्रह 40 फूट व्यास एवढ्या आकाराचा आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितले की, "निसार उपग्रह संपूर्ण जगासाठी भारत-अमेरिका सहकार्याचा अभूतपूर्व परिणाम ठरणार आहे."


निसार उपग्रहाची वैशिष्ट्ये


NISAR उपग्रह सुमारे 40 फूट (12 मीटर) व्यासाच्या ड्रम-आकाराच्या रिफ्लेक्टर अँटेनासह रडार डेटा गोळा करेल. यामुळे पृथ्वीच्या जमिनीतील आणि बर्फाच्या पृष्ठभागामध्ये बदल पाहण्यासाठी मदत होईल. हा उपग्रह इंटरफेरोमेट्रिक सिंथेटिक ऍपर्चर रडार नावाचे सिग्नल-प्रोसेसिंग तंत्र वापरून डेटा संकलन करेल.