जीसॅट-9 च्या निर्मितीसाठी 235 कोटींचा खर्च आला आहे. उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इस्रो’च्या या कामगिरीचे कौतुक केलं.
https://twitter.com/ANI_news/status/860459937524207616
सार्क देशांसाठी उपग्रह सोडण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. सार्क देशांतील आठपैकी सात सदस्य या प्रकल्पाचा भाग आहेत. पाकिस्तानने त्यात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
भारताकडून आपल्याला कोणतीही ‘भेट’ घेण्याची इच्छा नाही, असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. या उपग्रहामुळे दूरसंचार आणि प्रसारणाशी संबंधित सेवा आणि आपत्ती व्यवस्थापनास सहकार्य शक्य होईल.
बातमीचा व्हिडीओ -