ISRO Satellites Launched : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने  (ISRO) ने शनिवारी रात्री 12:07 वाजता आपल्या सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केले. ISRO चे  रॉकेट LVM-3 आकाशाकडे झेपावल्यामुळे भारताने ग्लोबल कमर्शियल लॉन्च मार्केटमध्ये एक नवीन इतिहास रचला. या प्रक्षेपणासह, इस्रोने सर्व भारतीयांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. कारण LVM3 M2/OneWeb India1 हे मिशन पूर्णत: यशस्वी झाले. OneWeb च्या 36 रॉकेट प्रक्षेपणाच्या या मिशनसाठी, ISRO ने आपले सर्वात वजनदार रॉकेट 'LVM-3' म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क 3 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून मध्यरात्री 12:07 वाजता प्रक्षेपित केले.


24 तासांचा काउंटडाऊन 


LVM-3 पूर्वी या रॉकेटला GSLV मार्क रॉकेट म्हणूनही ओळखले जात होते. या मिशनसाठी 24 तासांचा काउंटडाऊन ठेवण्यात आला होता. या मिशनमध्ये ब्रिटिश स्टार्टअप वनवेबचे 36 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. वनवेब ही एक खाजगी उपग्रह संपर्क कंपनी आहे. इसरोने ग्लोबल कमर्शियल लॉन्च सर्विस मार्केटमध्ये आपला प्रवेश नोंदविला आहे.


8,000 किलोपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता


इसरोचे अध्यक्ष म्हणाले, 43.5 मीटर लांब रॉकेट 8,000 किलोपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता असलेला हा सर्वात वजनदार उपग्रह म्हणून ओळखला जातो. पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात LVM3 द्वारे 36 OneWeb उपग्रहांचा आणखी एक सेट लॉंच केला जाईल, असेही ते म्हणाले.


 






 


ISRO साठी हे प्रक्षेपण महत्त्वपूर्ण 


हे तीन-स्टेज रॉकेट आहे, ज्यामध्ये दोन सॉलिड मोटर स्टेप्स ऑन आणि एक प्रोपोलेंट स्टेज आहे. मध्यभागी एक क्रायोजेनिक स्टेज आहे. या वजनी रूपामुळे त्याला इस्रोचा बाहुबली असेही म्हणतात. ISRO साठी हे प्रक्षेपण महत्त्वपूर्ण आहे. कारण LVM3-M2 मिशन हे ISRO ची व्यावसायिक शाखा असलेल्या NewSpace India Limited साठी पहिले समर्पित व्यावसायिक मिशन आहे.


भारताकडून 300 हून अधिक व्यावसायिक प्रक्षेपण


जगातील बहुतेक देश आता त्याच्या सर्वात मोठ्या प्रक्षेपणासाठी भारताकडे पाहतो. कारण भारताने आतापर्यंत 300 हून अधिक व्यावसायिक प्रक्षेपण केले आहेत आणि जगाला सांगितले आहे की, कमी खर्चातही ध्येय कसे साधले जाऊ शकते. कमी बजेटमध्ये मंगळावर पोहोचून भारताने ते दाखवून दिले होते. त्यामुळे इस्रोवर संपूर्ण जगाचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत पीएसएलव्हीच्या माध्यमातून व्यावसायिक प्रक्षेपण पूर्ण झाले होते, आता या बाहुबलीच्या व्यावसायिक बाजारपेठेत प्रवेश केल्याने, इस्रो आणि एनएसआयएलसाठी नवीन व्यासपीठ उघडणार आहे. या प्रक्षेपणाच्या यशाने, ISRO ने जगभरात आपली क्षमता सिद्ध केली आहे. हे स्पष्ट आहे की, या ऐतिहासिक क्षणामुळे इस्रोसाठी नवीन संधींचे दरवाजे देखील उघडतील, जे थेट महसूलासाठी फायदेशीर ठरतील.