Gaganyaan Astronauts Name : इस्त्रोने (ISRO) गगनयानच्या चार अंतराळवीरांची नावे जगासमोर आणली आहेत. प्रशांत नायर (Prashanth Nair), अंगद प्रताप (Angad Prathap), अजित कृष्णन (Ajit Krishnan) आणि शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) अशी या चार अंतराळवीरांची नावं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या चारही जणांना एस्ट्रोनॉट विंग्स म्हणजेच अंतराळवीर पंख देऊन जगासमोर सादर केले. हे चारही भारतीय हवाई दलाचे (Test Pilot) चाचणी वैमानिक आहेत. हे चौघेही बेंगळुरू येथील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. 


 


 






 


चौघांची गगनयान अंतराळवीर प्रशिक्षणासाठी निवड 


या चौघांबद्दल विशेष माहिती अशी की, देशातील सर्व प्रकारची लढाऊ विमाने त्यांनी उडवली आहेत. या चारही जणांनी प्रत्येक प्रकारच्या लढाऊ विमानांची कमतरता आणि वैशिष्ट्ये जाणून घेतली आहेत. त्यामुळे या चौघांची गगनयान अंतराळवीर प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना रशियामध्ये प्रशिक्षण मिळाले असून सध्या बेंगळुरू येथील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सुरू आहे.


 


अनेक वैमानिकांच्या चाचणीनंतर निवड


माहितीनुसार, गगनयान मोहिमेसाठी शेकडो वैमानिकांची चाचणी घेण्यात आली. यानंतर 12 जणांची निवड करण्यात आली. हे 12 प्रथम निवडण्यात आले. इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन (IAM) मध्ये त्यांची निवड झाली. यानंतर निवड प्रक्रियेच्या अनेक फेऱ्या पूर्ण झाल्या. त्यानंतर इस्रो आणि हवाई दलाने चार चाचणी वैमानिकांची नावे निश्चित केली. इस्रोच्या ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये (HSFC) अनेक प्रकारचे सिम्युलेटर बसवले जात आहेत. ज्यावर चौघेही सराव करत आहेत. हे चौघंही सरावासोबतच फिटनेसकडेही लक्ष देत आहे. हे चौघे गगनयान मोहिमेवर उड्डाण करणार नाहीत. तर यापैकी गगनयान मोहिमेसाठी 2 किंवा 3 चाचणी वैमानिक निवडले जातील.


 


अंतराळवीरांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष


या यानात क्रू एस्केप सिस्टम म्हणजेच सुरक्षेकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे.  कोणत्याही प्रकारचा धोका असल्यास, क्रू मॉड्यूलने अंतराळवीरांना सुरक्षितपणे परत आणले पाहिजे, असा प्रयत्न असणार आहे. रॉकेटमध्ये काही बिघाड झाल्यास, अंतराळवीरांना दूर हलवून सुरक्षित ठेवले जाईल. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, क्रू मॉड्यूल अंतराळवीरांना घेऊन समुद्रात जाईल. माहितीनुसार इस्रोच्या शास्त्रज्ञांनी गगनयान संबंधित चार ते पाच प्रकारच्या आपत्कालिन धोक्यांवर काम केले आहे. जेणेकरुन क्रू मॉड्युल अंतराळवीरांना या धोक्यांपासून वाचवू शकेल. क्रू मॉड्युल प्रत्येक धोक्याला वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देईल. तो स्वत: उंची आणि वेग नियंत्रित करेल आणि अंतराळवीरांना सुरक्षितपणे जमिनीवर आणेल.


 


 


हेही वाचा>>>


Israel-Hamas War: इस्रायल-हमासमध्ये सुरू असलेले युद्ध आता संपणार का? रमजानच्या पार्श्वभूमीवर युद्धविरामावरील करार