Chandrayaan 2 | विक्रम लँडरचं स्थान कळालं, इस्त्रो प्रमुख सीवन यांची माहिती
एबीपी माझा वेब टीम | 08 Sep 2019 02:18 PM (IST)
ऑर्बिटरने विक्रम लँडरची छायाचित्रे पाठवली आहेत. त्यावरुन लँडरचं स्थान कळालं असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के सीवन यांनी एएनआयला दिली आहे.
चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यानंतर संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचं स्थान कळालं असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के सीवन यांनी एएनआयला दिली आहे. ऑर्बिटरने विक्रम लँडरचा फोटो पाठवला आहे. ऑर्बिटरकडून मिळालेल्या माहितीमुळे विक्रम लँडरचं स्थान कळालं आहे. इस्रोकडून विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत असल्याचं सीवन यांनी म्हटलं आहे. अवघ्या जगाचं लक्ष लागलेली भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान मोहीम चंद्राच्या 2.1 किलोमीटरवर जाऊन थांबली आहे. चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यावर विक्रम लँडरशी संपर्क तुटला आहे. पण अजूनही संपर्क होण्याची आशा कायम आहे. लँडरशी संपर्क तुटल्यानंतर इस्त्रोकडून ऑर्बिटद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. ऑर्बिटरने विक्रम लँडरची छायाचित्रे पाठवली आहेत. त्यावरुन लँडरचं स्थान कळालं असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के सीवन यांनी एएनआयला दिली आहे. मात्र अद्याप लँडरशी कोणताही संपर्क झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इसरोच्या शास्त्रज्ञांचं डेटा विश्लेषणाचं काम सुरु आहे. लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न इस्त्रोकडून करण्यात येत आहे. लवकरच त्यात यश मिळेल, अशी आशा सीवन यांनी व्यक्त केली आहे. संबंधित बातम्या : Chandrayaan 2 | इस्रो प्रमुख के सिवन यांना अश्रू अनावर, पंतप्रधान मोदींनी धीर दिला! Chandrayaan-2 | विक्रम लँडरशी संपर्क होण्याची आशा कायम, इसरोच्या शास्त्रज्ञांचं डेटा विश्लेषणाचं काम सुरु लॅण्डरशी संपर्क तुटण्यामागील कारण काय?