Isro quick space tourism : भारतामधील लोकांना आता लवकरत अंतराळात फिरायला जाण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी इस्रो ( ISRO ) स्पेस टूरिस्ट फ्लाइट तयार करत आहे, अशी माहिती केंद्रीय अणु उर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. येणाऱ्या काळात जगभरात स्पेस टुरिज्म प्रोजेक्टचं मार्केट मिलिअन डॉलरचं असणार आहे. या स्पर्धेत भारतही लवकरच उतरणार आहे.  पृथ्वीच्या निम्न कक्षेतील मानवी उड्डाण क्षमता प्रदर्शनाच्या माध्यमातून इस्रो स्वदेशी अंतराळ पर्यटन विकसित करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी त्यांनी दिली.  


राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिलेल्या माहितीत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, 'भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधीकरण केंद्र (इन-स्पेस) सुरूवातीपासून शेवटपर्यंत अंतराळ उपक्रमांमध्ये खाजगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देण्याचाही प्रयत्न करत आहे. यामध्ये अंतराळ पर्यटनाचाही समावेश आहे.' ‘गगनयान मिशन’असे त्याला नाव देण्यात आले आहे. त्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे. लवकरच भारत एक अथवा दोन जणांना अंतराळात पाठवेल. यासाठी 2022 च्या अखेरपर्यंत दोन ट्रायल करण्यात येणार आहेत, असे  त्यांनी यावेळी सांगितलं. 


अंतराळ क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या मुद्यावर सिंह म्हणाले की,  'भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) अंतराळ उपक्रमांच्या विविध प्रकारच्या क्षेत्रांसंदर्भात 61 देशांकडून आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संबंधांचा पाठपुरावा करतेय. तसेच अंतराळ विज्ञानात स्वारस्य असलेले तरूण व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचा समावेश करून त्याद्वारे अंतराळ कार्यक्षेत्रात खासगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन, आधार देणे आणि प्राधिकृत करण्याचा त्याचा उद्देश आहे. इन स्पेस देशभरातील इस्रो केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या तांत्रिक सुविधा आणि तज्ञ मार्गदर्शन खाजगी संस्थांना सामायिक करण्यासाठी सक्षम यंत्रणा घेऊन येईल.'


एका संबंधित प्रश्नाला उत्तर देताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की, अंतराळ विभाग (डीओएस) अंतराळ धोरणाचा सर्वसमावेशक, एकात्मिक मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेत सुरु आहे. जे धोरण खाजगी भारतीय अंतराळ उद्योगाच्या उपक्रमांना दिशा प्रदान करेल.