मुंबई : कोरोना लस उपलब्ध नसल्याने राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण बंद झालं आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने कोरोना लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला होता. मात्र मागणी प्रमाणे पुरवठा होत नसल्याने लसीचा तुटवडा अनेक ठिकाणी भासत आहे. अनेक राज्यांनी लस मिळत नसल्याबद्दल केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे. यावर राजकारणही केलं जात आहे. देशातील लस केंद्रावरही लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सरकार आणि लस उत्पादकांवर लसीच्या उत्पादन वाढवण्याचा दबाव वाढला आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लसीचे उत्पादन आणखी काही आठवड्यांसाठी वाढवले जाणार नाही असे संकेत आहेत. सध्या या लसीचे उत्पादन मर्यादित राहील. पुढील महिन्यापासून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक लस तयार करण्याची क्षमता वाढवतील अशी अपेक्षा आहे.


Corona | देशात कोरोनाची दुसरी लाट भयंकर, गेल्या वर्षीच्या तुलनेत गंभीर रुग्णांची संख्या वाढली


सीरम इन्स्टिट्युटमध्ये सर्वाधिक उत्पादन


सीरम इन्स्टिट्युटची सध्याची क्षमता एका महिन्यात 6 ते 8 कोटी डोस लस तयार करण्याची आहे. सीरमला जानेवारी-फेब्रुवारी 2021 पर्यंत दरमहा 10 कोटी लस तयार करण्याचे लक्ष्य दिले गेले होते, परंतु आतापर्यंत त्याचे उत्पादन या उद्दीष्टापर्यंत पोहोचलेले नाही. अशी शक्यता आहे की पुढच्या महिन्यापासून सीरम इन्स्टिट्युट 10 कोटी लस तयार करण्यास सुरुवात करेल. सीरम इन्स्टिट्युटने आतापर्यंत देशात 10 कोटी डोस पुरवले आहेत. अहवालानुसार, ऑगस्टपर्यंत भारतात 47 कोटी डोस लसींची गरज भासणार आहे. सरकार याचा एक मोठा भाग सीरम इन्स्टिट्युटकडून मागवणार आहे.


कोरोनाच्या नियमांचं पालन करा, अन्यथा... केंद्रीय निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना इशारा


भारत बायोटेक वर्षाला 50 कोटी लस तयार करणार


सीरमप्रमाणे भारत बायोटेकलाही त्यांचे उत्पादन दुप्पट करायचे आहे. सध्या तो दररोज 2 लाख डोस लसीचं उत्पादन करतात. पुढील महिन्यात हे उत्पादन 5 लाखांपर्यंत वाढवण्याची योजना आहे. यासाठी बंगळुरू प्लांटमध्ये एक मोठा बायो रिअॅक्टर बसवण्यात आला आहे. त्यात दरवर्षी 20 कोटी लस तयार करण्याची क्षमता असेल. या वर्षाच्या अखेरीस हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये असे आणखी चार प्रकल्प उभारण्याची योजना असून त्यामुळे भारत बायोटेकची वार्षिक क्षमता 70 कोटी इतकी होईल. कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या वर्षाच्या अखेरीस कंपनी वार्षिक 50 कोटी लसींच्या उत्पादनाचं लक्ष्य गाठेल.