Ramayana Yatra 21 June : भारतीय रेल्वेचं (Indian Raliway) जाळं देशभर पसरलं आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी झपाट्यानं विस्तारत आहे. IRCTC आपल्या प्रवाशांसाठी अनेक उत्तम टूर पॅकेजेस ऑफर करते, ज्याद्वारे तुम्ही संपूर्ण भारताचा दौरा करू शकता. पण, आता पहिल्यांदाच आयआरसीटीसी IRCTC च्या टूर पॅकेजसह, तुम्ही शेजारच्या देशालाही भेट देऊ शकाल. IRCTC आता नवं टूर पॅकेज आणत आहे. यामध्ये तुम्हांला भारत-नेपाळ यात्रा करता येईल. भारतीय रेल्वे यात्रेकरूंना भगवान रामाच्या जीवनाशी निगडित पवित्र स्थळी नेण्यासाठी 21 जून रोजी विशेष पर्यटक ट्रेनद्वारे 18 दिवसांची 'श्री रामायण यात्रा' सुरू करणार आहे.
आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, भारतातून ट्रेन नेपाळला जाईल अशी ही पहिलीच वेळ असेल. ही विशेष ट्रेन अयोध्या आणि जनकपूर (नेपाळ) या दोन धार्मिक शहरांना जोडेल. ही ट्रेन सुमारे 8000 किलोमीटरचा प्रवास करेल. श्री रामायण यात्रेचे हे टूर पॅकेज 17 दिवस आणि 18 रात्रीचं असेल. ही ट्रेन 21 जूनपासून सुरु होणार आहे.
जनकपूर हे नेपाळमधील प्रसिद्ध वैष्णव तीर्थस्थान आहे. हे स्थान प्रभू श्रीराम यांची पत्नी अर्थात सीतामाई यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. जनकपूर ही राजा जनकाच्या मिथिला राज्याची राजधानी होती. जनकपूर हे भारतातील बिहार राज्यातील सीतामढी किंवा दरभंगापासून 24 मैल अंतरावर नेपाळमध्ये आहे.
21 जूनपासून सुरू होणार प्रवास
ही विशेष टूर 18 दिवसांची असेल. यामध्ये तुम्ही भेट देणार त्या ठिकाणी जेवण, हॉटेलमध्ये राहणे आणि मार्गदर्शक सेवांचा समावेश असेल. भारतीय रेल्वे यात्रेकरूंना भगवान रामाच्या जीवनाशी निगडित पवित्र स्थळी नेण्यासाठी 21 जून रोजी विशेष पर्यटक ट्रेनद्वारे 18 दिवसांची 'श्री रामायण यात्रा' सुरू करणार आहे.
कुठे-कुठे करता येणार प्रवास?
'रामायण ट्रेन' अयोध्या, जनकपुर (नेपाळ), सीतामडी, बक्सर, वाराणसी, प्रयागराज, श्रृंगवेरपूर, चित्रकूट, नाशिक, हंपी, रामेश्वरम, कांचीपुरम और भद्राचलम यासारख्या प्रमुख ठिकाणांना भेट देणार आहे.
IRCTC रामायण यात्रा ट्रेन बुकिंग
'भारत गौरव टुरिस्ट ट्रेन' टूरचं बुकिंग सुरू झालं आहे. 21 जूनला दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून हा प्रवास सुरू होईल. दिल्ली व्यतिरिक्त, अलीगड, टुंडला, कानपूर आणि लखनौ हे इतर बोर्डिंग पॉइंट आहेत. देशाच्या विविध भागांतून 285 बुकिंग यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक 61 बुकिंग महाराष्ट्रातून आणि 55 बुकिंग उत्तर प्रदेशातून करण्यात आल्या आहेत. IRCTC कडून सांगण्यात आलं आहे की, पहिल्या 50 टक्के प्रवाशांना भाड्यात 5 टक्के सूट दिली जाईल. प्रवाशांना तिकीट बुक करण्यासाठी EMI पेमेंट पर्यायाची सुविधा देखील मिळेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या