IRCTC Tour Package : उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकजण प्रवासाचं नियोजन करू लागले आहेत. या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही धार्मिक सहलीची योजना आखत असाल, तर IRCTC तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर घेऊन आली आहे. हे टूर पॅकेज दो धाम यात्रेचे आहे. हिंदू धर्मात चार धाम यात्रेला खूप महत्त्व आहे. या प्रवासाची खास गोष्ट म्हणजे याद्वारे तुम्हाला फ्लाइटमध्ये प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच संपूर्ण ट्रिपमध्ये फिरण्यासाठी बस सुविधाही उपलब्ध आहे.
तुम्हालाही मे महिन्यात केदारनाथ आणि बद्रीनाथला जायचे असेल तर तुम्ही IRCTC च्या या खास टूर पॅकेजचा अनुभव घेऊ शकता. या अद्भुत टूर पॅकेज दो धाम यात्रेबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या. त्याचबरोबर प्रवासासाठी किती खर्च येईल हे ही जाणून घ्या.
'या' ठिकाणी भेट देण्याची संधी मिळेल
या टूर पॅकेजचे नाव आहे दो धाम यात्रा एक्स-गुवाहाटी (IRCTC Do Dham Yatra Ex-Guwahati). या पॅकेजद्वारे तुम्हाला गुवाहाटी ते दिल्ली आणि दिल्ली ते हरिद्वार-गुप्तकाशी-सोनप्रयाग-केदारनाथ-जोशीमंत-बद्रीनाथ-रुद्रप्रयाग-श्रीनगर-ऋषिकेश जाण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर ही यात्रा पूर्ण करून तुम्ही हरिद्वारला जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही हरिद्वार ते दिल्ली आणि नंतर दिल्ली ते गुवाहाटी फ्लाईट प्रवास असणार आहे. हा संपूर्ण प्रवास एकूण आठ रात्री आणि नऊ दिवसांचा असणार आहे. केदारनाथची ही यात्रा 20 मे पासून सुरु होऊन 29 मे रोजी संपणार आहे.
दो धाम यात्रेत या सुविधा मिळतील
- या पॅकेजमध्ये तुम्हाला इकॉनॉमी क्लासमध्ये गुवाहाटी ते दिल्ली उड्डाण करण्याची सुविधा मिळेल.
- रात्री तुम्हाला सर्वत्र हॉटेल सुविधा मिळतील.
- नाश्ता आणि रात्रीचे जेवण दररोज उपलब्ध असेल.
- प्रवाशांना सर्वत्र प्रवास करण्यासाठी बसची सुविधा दिली जाणार आहे.
- प्रवासादरम्यान प्रवास विमा उपलब्ध असेल.
दो धाम यात्रेसाठी लागणारे शुल्क
- या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 62,360 रुपये द्यावे लागतील.
- त्याच वेळी, दोन लोकांना प्रति व्यक्ती 45,920 रुपये द्यावे लागतील.
- तीन लोकांना प्रति व्यक्ती 44,760 रुपये शुल्क भरावे लागेल.
- मुलांसाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागेल.
महत्वाच्या बातम्या :