IRCTC Tour Package: तुम्हीही जर चारधाम यात्रेला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. IRCTC ने तुमच्यासाठी खास पॅकेज आणले आहे, ज्यामध्ये तुम्हाला चारधामांना भेट देण्याची संधी मिळत आहे. IRCTC ने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.


पॅकेजचे तपशील पाहूया: 



  • पॅकेजचे नाव - चारधाम यात्रा

  • डेस्टिनेशन - हरिद्वार, बरकोट, जानकीछट्टी, यमुनोत्री, उत्तरकाशी, गंगोत्री, गुप्तकाशी, सोन प्रयाग, केदारनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार

  • हॉटेल - डिलक्स


किती खर्च येईल?


जर तुम्ही या पॅकेजमध्ये एकट्याने प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 77600 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय जर तुम्ही दोन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 61400 रुपये खर्च करावे लागतील. तसेच तीन जण असल्यासप्रति व्यक्ती 58900 रुपये खर्च करावे लागतील.


लहान मुलांसाठी येईल इतका खर्च


5 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी या पॅकेजमध्ये प्रति व्यक्ती 33300 रुपये तिकीट ठेवण्यात आली आहे. बेड न घेतल्यास प्रत्येक मुलामागे 27700 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय 2 ते 4 वर्षांच्या मुलासाठी 10200 रुपये खर्च करावे लागतील.


कोणत्या सुविधा मिळणार



  • या पॅकेजमध्ये तुम्हाला दोन्ही बाजूंनी फ्लाइटची सुविधा मिळेल.

  • डिलक्स हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा करण्यात येईल.

  • ही व्यवस्था 11 दिवसांसाठी असेल.

  • संपूर्ण टूरसाठी IRCTC टूर मॅनेजर उपलब्ध असेल.

  • नाश्ता आणि रात्रीचे जेवण देखील उपलब्ध असेल.

  • यामध्ये पार्किंग शुल्क आणि टोल टॅक्सचाही समावेश केला जाणार आहे.


अधिकृत लिंकला भेट द्या


या पॅकेजबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही 8287931660 आणि 9321901804 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय तुम्ही https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=WMA59C या अधिकृत लिंकलाही भेट देऊ शकता.


इतर महत्वाच्या बातम्या: