Holi 2022 Special Trains : भारतीय रेल्वेने (IRCTC Indian Railway) प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई सेंट्रल (Mumbai Central) आणि वांद्रे टर्मिनस (Bandra Terminus) येथून विशेष होळी सुपरफास्ट ट्रेन चालविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या विशेष गाड्यांचे बुकिंग आज (बुधवार) 2 मार्च 2022 पासून PRS काऊंटर आणि IRCTC वेबसाईट irctc.co.in वर सुरू झाले आहे. पश्चिम रेल्वेने (Western Railway) ट्विट केले की, होळीच्या सणादरम्यान प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून विशेष होळी स्पेशल सुपरफास्ट ट्रेन चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रेन क्रमांक 09039, 09035, 09005 आणि 09006 साठी बुकिंग 2 मार्च 2022 पासून PRS वर सुरू होईल.
होळी सुपरफास्ट गाड्यांचे तपशील पाहा :
1. ट्रेन क्रमांक 09039 16 मार्च रोजी रात्री 11.55 वाजता जयपूरसाठी मुंबई सेंट्रलहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7.25 वाजता तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचेल.
2. ट्रेन क्रमांक 09040 जयपूर ते बोरिवली 17 मार्च रोजी रात्री 9.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3.10 वाजता तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचेल.
3. ट्रेन क्रमांक 09035 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता वांद्रे टर्मिनसवरून की कोठीसाठी निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता गंतव्यस्थानावर पोहोचेल.
4. ट्रेन क्रमांक 09036 ही 17 मार्च रोजी सकाळी 11.40 वाजता वांद्रे टर्मिनस येथून भगत की कोठी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.15 वाजता गंतव्यस्थानावर पोहोचेल.
5. ट्रेन क्रमांक 09005 14 मार्च रोजी वांद्रे टर्मिनस ते भावनगर टर्मिनसला रात्री 9.45 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता गंतव्यस्थानी पोहोचेल.
6. गाडी क्रमांक 09006 16 मार्च रोजी सकाळी 10.10 वाजता भावनगर टर्मिनस ते वांद्रे टर्मिनससाठी सुटेल. त्याच दिवशी 11.25 वाजता ती गंतव्यस्थानी पोहोचेल.
जनरल तिकीट काढून प्रवास करता येईल
रेल्वे मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, सर्व गाड्या पूर्वीप्रमाणे पूर्ववत करण्यात आल्या आहेत. जनरल डब्यांची जुनी व्यवस्था पूर्ववत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रवाशांना आता पूर्वीप्रमाणेच ट्रेनमध्ये प्रवास करता येणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांना जनरल तिकिटावर प्रवास करता येणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Petrol-Diesel Price : रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा उच्चांक, देशात दर काय?
- OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
- Weather : उत्तर भारतात हलका पाऊस पडण्याचा अंदाज, तर महाराष्ट्रात तापमानात चढ उतार कायम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha