Coronavirus Cases : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची  (Coronavirus) संख्या 10 हजारांच्या खाली आली आहे. हळूहळू कोरोना रुग्णसंख्येत घट येत असल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 7 हजार 554 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 223 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, कालच्यापेक्षा आज कोरोना रुग्णांच्या संख्येत थोडीशी वाढ झाली आहे. काल देशात 6 हजार 915 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, तर 180 जणांचा मृत्यू झाला होता.


दरम्यान, देशात सक्रिय रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असल्याचे चित्र आहे. सध्या देशात 85 हजार 680 सक्रिय रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत कोरोनामुले मृत्यू होणार्या रुग्णांची संख्या ही 5 लाख 14 हजार 246  झाली आहे. तर आत्तापर्यंत 4 कोटी 23 लाख 38 हजार 673 रुग्ण कोरोनातून बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.







 


दिल्लीत कोरोनाचे नवीन 344 रुग्ण, तर 4 जणांचा मृत्यू


मंगळवारी दिल्लीत आणखी 344 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीतील संसर्ग दर हा 0.80 टक्के होता. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत राष्ट्रीय राजधानीत एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 18 लाख 60 हजार 236 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत  कोरोनामुळे 26 हजार 126 जणांचा मृत्यू झाला आहे.


आतापर्यंत 177 कोटी लसींचे डोस देण्यात आले 


सध्या देशात वेगाने लसीकरण सुरु आहे. ज्यांनी लस घेतली नाही अशा नागरिकांना लस घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत सुमारे 177 कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 8 लाख 55 हजार 862 डोस देण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत एखूण लसींचे 177 कोटी 79 लाख 92 हजार 977 डोस देण्यात आले आहेत. 


दरम्यान, महारष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव  आटोक्यात येत असून  राज्यातील  रुग्णसंख्या कमी होताना  दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 675 नवीन रुग्णांची भर पडली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 1 हजार 225 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच राज्यात काल 104 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 4 हजार 733 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 4 हजार 509 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 202 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत