IOCL, Petrol-Diesel Price Today 5 April 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल (Crude Oil) ची किंमत जरी 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. अशातच, भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींच्या (Petrol-Diesel) दरवाढीचं सत्र मात्र काही करुन थांबण्याचं नाव घेईना. देशात (Fuel Prices) पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दररोज वाढ होत असल्याचं दिसत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. 


दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत 13 वेळा वाढ झाली आहे. 22 मार्चपासून सुरू झालेलं वाढीचं सत्र आटोक्यात येण्याचं नाव घेत नाही. 15 दिवसांपैकी 24 मार्च आणि 1 एप्रिल हे दोनच दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल न झाल्यानं दर स्थिर होते. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 2 आठवड्यात हळूहळू पेट्रोल 9.20 रुपयांनी महागलं आहे.



भारतीय तेल कंपन्यांनी 5 एप्रिल रोजी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी प्रतिलिटर वाढ केली आहे. भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत 84 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरांत 85 पैसे प्रति लिटरची वाढ झाली आहे. दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल 119.67 रुपये प्रति लिटरवर, तर डिझेल 103.92 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. मुंबईतर गेल्या पंधरा दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरांत झालेली ही तेरावी वाढ आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू झाले आहेत. 


देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतही पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 80-80 पैशांनी वाढल्या आहेत. त्यामुळे आता राजधानी दिल्लीत पेट्रोल 104.61 रुपये प्रति लिटर तर डिझेल 95.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.


दररोज बदलतात पेट्रोल-डिझेलच्या किमती 


आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात. 


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).