IOCL, Petrol-Diesel Price Today 4 April 2022 : देशात पेट्रोल-डिझेल, एलपीजी सिलेंडर, दूध आणि भाज्यांसह दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर (Crude Oil Price) जरी 100 डॉलर प्रति बॅरलच्या पार पोहोचले आहेत. पण भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol-Diesel Price) वाढ होण्याचं सत्र सुरुच आहे. 


पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत आज (सोमवारी) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात पेट्रोलचे दर प्रति लिटर 118.83 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलनं उच्चांकी पातळी गाठली आहे. मुंबई डिझेल 103.07 प्रति लिटरवर पोहोचले आहेत. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी 40-40 पैसे प्रति लिटरची वाढ झाली आहे. त्यासोबतच दिल्लीमध्ये आता पेट्रोल 103.81 रुपये आणि डिझेल 95.07 लिटरवर पोहोचलं आहे. 


दरवाढीचा झटका, हळूहळू देतायत तेल कंपन्या 


देशात 22 मार्च 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. 22 मार्च ते 23 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेल प्रतिदिन 80 ते 80 पैशांनी महागलं. 24 मार्च रोजी कोणताही बदल झाला नाही, मात्र 25 मार्चपासून पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल 26 पर्यंत 80-80 पैशांनी वाढलं. यानंतर 27 मार्च रोजी पेट्रोल 50 पैसे तर डिझेल 55 पैसे महागले. 


28 मार्च रोजी पेट्रोल 30 पैशांनी तर डिझेल 35 पैशांनी वाढले. 29 मार्च रोजी पेट्रोल 80 पैशांनी आणि डिझेल 70 पैशांनी वाढले, 30 मार्चला पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ झाली आणि 31 मार्चला पेट्रोल आणि डिझेलचे दर 80 पैशांनी वाढले. तर 1 एप्रिल रोजी कोणताही बदल झाला नाही. त्यानंतर 2 एप्रिल आणि 3 एप्रिल रोजीही पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे. 


14 दिवसांत 12 टप्प्यांमध्ये पेट्रोलच्या दरात अनुक्रमे 80, 80, 80, 80, 50, 30, 80, 80, 80, 80, 80 आणि 40 पैशांची वाढ झाली आहे. अशाप्रकारे पेट्रोल 8 रुपये 40 पैशांनी महागले आहे. 



मुंबईत पेट्रोलचा दर 118 रुपयांच्या पुढे 


इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) नंने जारी केलेल्या ताज्या दरांनुसार, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 04 एप्रिल 2022 रोजी पेट्रोलचा दर प्रति लिटर 118.83 रुपये झाला आहे. तर डिझेलचा दर 103.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, स्थानिक करांवर अवलंबून, राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. देशातील चार महानगरांची तुलना केल्यास मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. दिल्लीशिवाय इतर सर्व महानगरांमध्ये 100 रुपयांच्या पुढे डिझेल विकले जात आहे. 


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).