INS Visakhapatnam : स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS विशाखापट्टणम आज नौदलात दाखल होणार आहे. जहाजावरुन ब्रह्मोस आणि बराक यासारखी मिसाईल सोडणं शक्य आहे. यामुळे भारताची ताकद आणखी वाढणार आहे. स्वदेशी स्टेल्थ मिसाईल डेस्ट्रोयर जहाज आयएनएस विशाखापट्टनम संरक्षण मंत्री राजनाथ सिंगाच्या उपस्थित नौदलात दाखल होणार आहे. राजनाथ सिंग यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. सकाळी 10 वाजता मुंबई डॉकयार्ड मध्ये राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत INS विशाखापट्टणम नौदलात दाखल होणार आहे.
आयएनएस विशाखापट्टनम माझगाव डॉकयार्डमध्ये तयार करण्यात आली आहे. आयएनएस विशाखापट्टनम 163 मीटर लांब आणि 7400 टन वजनाची आहे. सर्फस टु एअर मिसाईल, ब्रह्मोस, टोरपीडो ट्यूब लॉचर, अँटी सबमरीन रॉकेट लॉचर, बीएचईएलची 76 एमएम सुपर रॅपिड सारखी हत्यारे आहेत. आता भारतीय नौदलात 130 युद्ध नौका आहेत. विशाखापट्टणम या युद्धनौकेची बांधणी स्वदेशी बनावटीच्या डीएमआर249 ए स्टीलचा वापर करून केली आहे. भारतात बांधण्यात आलेली ती सर्वात मोठी युद्धनौका आहे.
याशिवाय चार दिवसानंतर म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी स्कोर्पीन क्लासची चौथी पाणबुडी आयएनएस वेलाही भारताची समुद्रातील ताकद वाढवणार आहे. 25 तारखेला आयएनएस वेला नौदलात दाखल होणार आहे. या कार्यक्रमाला नौदलानचे प्रमुख एडमिरल करमबीर सिंह प्रमुख पाहुणे असणार आहेत. प्रोजेक्ट-75 अंतर्गत सहा पाणबुड्यांची बांधणी करण्यात येत आहे. नौदलाच्या ताफ्यात वेलाच्या समावेशामुळे या प्रकल्पातील निम्मा टप्पा पूर्ण होणार आहे. या पाणबुड्यांची बांधणी मुंबईतल्या माझगाव डॉक लिमिटेड(एमडीएल) येथे करण्यात येत आहे आणि फ्रेंच बनावटीच्या स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्यांच्या धर्तीवर त्या बांधण्यात येत आहेत. ही पाणबुडी वेस्टर्न नेव्हल कमांडच्या पाणबुड्यांच्या ताफ्यात समाविष्ट केली जाणार आहे. वेला ही चौथी पाणबुडी असून या पाणबुडीच्या बहुतेक सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि लढाईसाठी ती सज्ज आहे आणि कोणत्याही मोहिमेमध्ये ती सहभागी होऊ शकते. आयएनएस विशाखापट्टनमला मुंबईतील माझगाव डॉकयार्डमध्ये तयार करण्यात आलं आहे. हा नौदलाच्या प्रोजेक्ट 15बी चा एक भाग अशणार आहे. त्याअंतर्गत चार युद्घनौका तयार करण्यात येणार आहेत. यातील तीन युद्धनौका मोरमुगाओ, इम्फाल आणि सूरत तयार होणार आहेत. आयएएनएस मोरमुगाओ 2023 पर्यंत, इम्फाल 2024 पर्यंत आणि आयएनएस सूरत 2025 पर्यंत तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत आपली समुद्रीत ताकद वाढवत आहे.
पृष्ठभागावरून पृष्ठभागावर आणि पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम आणि लघु पल्ल्याच्या तोफा, पाणबुडीविरोधी रॉकेट्स, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र प्रणालीचा यात समावेश आहे. अतिशय ताकदवान कंबाईन्ड गॅस आणि गॅस प्रॉपल्शन प्रणालीवर पाणी कापत वेगाने जाणारी ही युद्धनौका 30 नॉट मैलापेक्षा जास्त वेगाने प्रवास करू शकते. आपली मारक क्षमता आणखी वाढवण्यासाठी या विनाशिकेवर दोन एकात्मिक हेलिकॉप्टर्सही तैनात करता येतात. अतिशय उच्च दर्जाची स्वयंचलित यंत्रणा आणि अत्याधुनिक डिजिटल नेटवर्क, कॉम्बॅट मॅनेजमेंट प्रणाली आणि इंटेग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट प्रणालीचा वापर या युद्धनौकेत करण्यात आला आहे. आयएनएस विशाखापट्टनम 163 मीटर लांब आहे. या जहाजाचं वजन 7400 टन आहे. सर्फस टु एअर मिसाईल, ब्रह्मोस, टोरपीडो ट्यूब लॉचर, अँटी सबमरीन रॉकेट लॉचर, बीएचईएलची 76 एमएम सुपर रॅपिड सारखी हत्यारे आहेत. आयएनएस विशाखापट्टन जहाज 75 टक्के स्वदेशी सामानाने तयार करण्यात आलं आहे. आयएनएस विशाखापट्टनमसह आता भारतीय नौदलात 130 युद्ध नौका आहेत.