Guwahati Delhi IndiGo Flight Emergancy Landing : पाटणा विमानाचा मोठा अपघात टळल्यानंतर गुवाहाटी विमानतळावरही विमानाचं इसरजन्सी लँडिंग (Emergancy Landing) करण्यात आलं. गुवाहाटीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या (Guwahati Delhi IndiGo Flight) विमानाने उड्डाण घेतल्यानंतर एका पक्ष्याची विमानाला धडक बसली यानंतर विमानांचं गुवाहाटी विमानतळावर इमरजन्सी लँडिंग करण्यात आलं. इंडिगो (IndiGo) कंपनीनं यासंदर्भात माहिती दिली आहे. या माहितीनुसार, फ्लाइट 6E 6394 विमानाचं इमरजन्सी लँडिंग करून यामधील प्रवाशांना दुसऱ्या विमानात बसवण्यात आलं.


रविवारी गुवाहाटीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर एका संशयास्पद पक्ष्याच्या धडकेमुळे हे विमान पुन्हा गुवाहाटी विमानतळावर उतरवण्यात आलं. यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना दिल्लीला जाणाऱ्या दुसऱ्या विमानात बसवण्यात आलं. त्यानंतर इमरजन्सी लँडिंग करण्यात आलेल्या विमानाचं निरीक्षण करण्यात आलं.


पक्ष्याची इंडिगोच्या विमानाला धडक
गुवाहाटी-दिल्लीला निघालेल्या इंडिगो एयरबस A320neo (VT-ITB) फ्लाइट 6E 6394 ने उड्डाण घेतल्यानंतर या विमानाचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आलं एकाच दिवसात विमानाचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आल्याची ही तिसरी घटना ठरली. गुवाहाटी आधी जबलपूर आणि पाटणामध्येही विमानाचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आल्याच्या घटना घडल्या.