Defense Expo 2022 : गुजरातची मधील गांधीनगर येथे सुरू असलेल्या डिफेन्स एक्स्पो- 2022 मध्ये लढाऊ वाहने सर्वाधिक प्रदर्शित करण्यात आली आहेत. चीनला लागून असलेल्या LAC वर तैनात असलेले इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल देखील या प्रदर्शनात आणण्यात आले होते. असेच एक स्वदेशी लढाऊ वाहन M-4 नुकतेच भारतीय सैन्याने स्वदेशी कंपनीकडून खरेदी केले आहे आणि पूर्व लडाखमध्ये तैनात केले आहे.


अलीकडेच भारतीय सैन्याने फास्ट ट्रक प्रक्रियेद्वारे स्वदेशी खाजगी M-4 इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल (ICV) खरेदी केले आहे. LAC वर चीनशी झालेल्या संघर्षादरम्यान भारतीय सैन्याला लडाखच्या उंच भागात हालचाली करताना खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. चीनचे पीएलए सैन्य आपल्या हमवी वाहनांमध्ये खूप वेगाने हालचाल करत होते. तर भारतीय सैनिक त्यांच्या जिप्सी किंवा बीएमपी वाहनच वापर करत होते, परंतु त्यांना उंचावरील भागात फिरताना काही अडचणींचा सामना करावा लागत होता. अशा परिस्थितीत भारतीय सैन्याने स्वदेशी कंपन्यांकडून हमवी शैलीतील आयसीव्ही बनवण्याचा आग्रह केला होता.


यामुळेच जिप्सी आणि बीएमपीऐवजी सैन्याने कल्याणी ग्रुपकडून एम-4 आणि टाटाची नवीन ICV खरेदी केली आहे. या M-4 मध्ये 9-10 सैनिक शस्त्रे घेऊन आरामात बसू शकतात. बसण्यासोबतच सैनिक त्यांचे शस्त्र घेऊन पोझिशन घेऊ शकता. याशिवाय या लढाऊ वाहनात एटीजीएम म्हणजेच अँटी टँक गाईडेड मिसाईलही बसवता येऊ शकते. जेणेकरून शत्रूचे रणगाडे नष्ट करता येतील. या लढाऊ वाहनाचे टायर पाहून तुम्ही थक्क व्हाल. याचे टायर ट्रकपेक्षा मोठे आणि मजबूत आहेत. जेणेकरून उंच आणि खडबडीत भूभागावरून जाताना कोणतीही अडचण येत नाही.


दरम्यान, M-4 हे वाहन कल्याणी ग्रुपने तयार केले आहे. कल्याणी समूह अनेक दशकांपासून संरक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. परंतु अलीकडच्या काळात सैन्यासाठी शस्त्रे बनवण्यासाठी खाजगी उद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे. याचा परिणाम म्हणून, M-4 बनवण्यासोबतच कल्याणी समूह DRDO च्या तयार केलेल्या Atags म्हणजेच Andvas Todd आर्टिलरी गन सिस्टीमचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत आहे. कल्याणी ग्रुप आणि टाटा ग्रुप या दोन्ही कंपन्या सैन्यासाठी तोफ तयार करत आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच या अटॅग्ज तोफेच्या सहाय्याने सलामी देण्यात आली.


इतर महत्वाची बातमी: 


Defense Expo 2022 : 'आम्हाला भारताच्या सहकार्याची गरज'; मालदीव, इथोपिया आणि मादागास्करच्या संरक्षण मंत्र्यांची प्रतिक्रिया