भोपाळ: मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्प असलेल्या बांधवगड येथे देशातील पहिल्या हॉट एअर बलून वाइल्ड लाइफ सफारीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पर्यटकांना आकाशातून या जंगलाचा विलक्षण नजारा पहायची संधी उपलब्ध झाली आहे.


अशा प्रकारचा प्रकल्प हा देशातील पहिलाच प्रकल्प असून तो बांधवगडमध्ये सुरु करण्यात आला आहे. याची सुरुवात मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांनी केली आहे. या एअर बलून सफारीला व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये प्रवेश नसणार आहे. या सफारीच्या माध्यमातून पर्यटकांना वाघ, बिबट्या तसेच अन्य जंगली प्राण्यांचे आकाशातून दर्शन घेता येणार आहे.


आफ्रिकेत अशी सुविधा
बांधवगड राष्ट्रीय उद्यानात अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांना एक अविस्मरणीय आनंद घेता येणार असल्याचं मत मध्य प्रदेश वनमंत्र्यांनी व्यक्त केलं. भारतात अशा प्रकारची सुविधा ही पहिल्यांदाच उपलब्ध होत आहे. आफ्रिकेच्या जंगलात अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.


जयपुर च्या Sky Waltz कंपनीकडे काम
मध्य प्रदेशच्या बांधवगडमध्ये सुरु करण्यात आलेली ही सुविधा आता लवकरच कान्हा, पेंच आणि पन्ना या व्याघ्र प्रकल्पातही सुरु करण्यात येणार आहे. बांधवगड व्याघ्र प्रकल्पात सुरु करण्यात आलेली हॉट एअर बलून वाइल्ड लाइफ सफारी ही जयपूरच्या Sky Waltz कंपनीच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे.


संबंधित बातम्या: