Moscow Plane Crash : मॉस्कोला (Moscow) जाणारं एक प्रवासी विमान (Plane) दुर्घटनाग्रस्त (Plane Crash) झाल्याची बातमी आहे. अफगाणी प्रसारमाध्यमांनी ही बातमी दिली आहे. अफगाणिस्तानातल्या बादाख्शान परिसरात हे विमान क्रॅश झाल्याचं सांगितलं जातं आहे. अफगाणिस्तानातील स्थनिक न्यूज चॅनल टोलो न्यूजने ही बातमी प्रसारित केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मॉस्कोच्या दिशेने निघालेलं विमान अफगाणिस्तानमध्ये कोसळल्याची माहिती मिळाली. हे विमान भारतीय नसून मोरक्कोचं विमान कोसळल्याचं समोर आलं आहे. हे विमान कोणत्या भारतीय कंपनीचं असल्याचा दावा करण्यात येत होता, पण हे विमान भारतीय नसून मोरक्कन असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


अपघातग्रस्त विमान भारतीय नाही


मीडिया रिपोर्टनुसार, मॉस्कोच्या दिशेने निघालेल्या प्रवासी विमानाचा अफगाणिस्तानमध्ये अपघात झाला आहे. मॉस्कोसाठी रवाना झालेलं प्रवासी विमान अफगाणिस्तानमध्ये कोसळलं. या दुर्घटनेचं कारण अद्याप समोर आलेली नाही. अफगाणिस्तानी मीडियाने विमान अपघाताची माहिती दिली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने टोलो न्यूजच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.


अफगाणिस्तानात मोरोक्कन विमान कोसळलं


नागरी उड्डाण मंत्रालयाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, हवाई रुग्णवाहिका म्हणून काम करणारी DF-10 मॉस्कोला जाण्यापूर्वी भारताच्या गया विमानतळावर इंधन भरण्यासाठी थांबली होती. मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत सांगितलं आहे की, "क्रॅश झालेले विमान हे मोरोक्कोमध्ये नोंदणीकृत DF-10 डसॉल्ट फाल्कन विमान आहे. ते भारतीय वाहक विमान नाही. हे विमान एअर अॅम्ब्युलन्स होते आणि ते थायलंडहून मॉस्कोला जात होते. गया विमानतळावर इंधन भरण्यासाठी थांबलो." 









मोरक्कोच्या विमानाला अफगाणिस्तानमध्ये अपघात


अफगाणिस्तान मीडियाने सूत्रांचा हवाल्याने माहिती देताना सांगितलं आहे की, मॉस्कोला जाणारे प्रवासी विमान शनिवारी बादाख्शानच्या वाखान भागात कोसळलं. बदख्शानमधील तालिबानच्या माहिती आणि संस्कृती प्रमुखाने या दुर्घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं की, प्रांतातील करण, मंजन आणि झिबाक जिल्ह्यांचा समावेश असलेल्या तोपखानेह पर्वतावर प्रवासी विमान कोसळल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत जीवितहानी बाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच विमान अपघाताचं कारणही स्पष्ट झालेलं नाही. सध्या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.