Indian National Calendar 2022 : भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार आज (22 मार्च) नवीन वर्षाचा दिवस आहे. आजची तारीख आहे भारतीय सौर दिनांक 1 चैत्र, शके 1944. दरवर्षी हा दिवस 22 मार्च रोजी येतो. गेल्या वर्षी लीप वर्ष असल्याने तो 21 मार्च रोजी आला होता. इसवी सनातून 78 वर्ष वजा केल्यानंतर सौरवर्ष येते. भारतात विविध प्रकारची कालगणना अस्तित्वात असली, तरी भारतीय राज्यघटनेची मान्यता असलेली ही एकमेव राष्ट्रीय कालगणना आहे. हे कॅलेंडर पूर्णपणे शास्त्रीय आधारावर तयार करण्यात आले आहे. इसवी सनातून 78 वजा केल्यावर सौर वर्ष येतं. आणि ज्या वर्षाला 78 ने भाग जातो ते लीप वर्ष असतं. आणि लीप वर्ष असल्यावर नवीन वर्षाचा पहिला दिवस 21 मार्चला येतो. 


22 मार्च या दिनाचं भौगोलिक वैशिष्ट्य : 


22 मार्चचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी दिवस आणि रात्र दोन्ही समान म्हणजेच 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. तर 21 जून हा सगळ्यात मोठा दिवस असतो. तर, 21 डिसेंबर हा सगळ्यात लहान दिवस असतो. हे पृथ्वीवर सर्व ठिकाणी सारखं आहे. 


1 चैत्र नवीन वर्षाची सुरुवात :


भारत सरकारने दिनांक 22 मार्च 1957 रोजी राष्ट्रीय कॅलेंडर अधिकृतपणे सुरु केले तो दिवस होता 1 चैत्र 1879. चैत्र हा भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरचा पहिला महिना आहे. भारतात अनेक सण या कॅलेंडरनुसार साजरे केले जातात. 22 मार्च म्हणजेच 1 चैत्रला सुरु होणारे हे कॅलेंडर मार्च ते फेब्रुवारी महिने असणार. ग्रेगेरियन दिनदर्शिकेप्रमाणे 1 जानेवारीला वर्षाचा आरंभ होतो. वास्तविक त्या दिवशी अवकाशात कोणतीही विशेष घटना होत नसते. त्याउलट सौर वर्षाप्रमाणे नववर्ष दिन 1 सौर चैत्र असतो. त्या दिवशी सूर्य विषुववृत्तावर येत असल्याने दिवस आणि रात्र दोन्ही समसमान असते. म्हणूनच या दिवसाला, म्हणजेच विषुवदिनाला वैज्ञानिक महत्त्व आहे.


21 डिसेंबर रोजी सूर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. दिवस आणि रात्रीचा कालावधी हा कमी अधिक होत असल्याचा अनुभव नेहमीच येतो. पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशाने कललेला असल्याने हे घडते. दरवर्षी 21 जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस ओळखला जातो. या खगोलीय घटनेला Summer Solstice म्हणून ओळखले जाते.


भारतीय सौर कॅलेंडर हे निसर्गाला अनुसरून आहे. 


या कॅलेंडरनुसार पाहता उन्हाळा 185 दिवसांचा असतो. तर, हिवाळा 180 दिवसांचा असतो. भारतीय सौर कॅलेंडरनुसार चैत्र महिना 30 दिवसांचा असतो. तर अश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ, फाल्गुन प्रत्येकी 30 दिवसाचे असतात. 
तर, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद हे पाच महिने 31 दिवसांचे असतात. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये एक महिन्यानंतर दुसरा महिना 31 दिवसांचा असतो. पण भारतीय सौर कॅलेंडरनुसार, पहिले सहा महिने 30 दिवसांचे असतात तर नंतरचे पाच महिने 31 दिवसांचे असतात. 


या दिवशी सर्व जगात कुठेही 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. तसेच, भारतात, आशिया खंडात, उत्तर गोलार्धात वसंत ऋतु सुरु होतो. सर्व सृष्टी नव्या मोहोराने टवटवीत होते. 


आज अनेक सरकारी कार्यालयांमध्ये हे कॅलेंडर नियमित पणे वापरलं जातं. हे कॅलेंडर आकाशवाणी, दूरदर्शन, दैनिक, शासकीय कॅलेंडर, शासकीय पत्रकांमधून इतकेच नाही तर संसदेतही याचं पालन केलं जातं. 


कसं तयार झालं हे अधिकृत कॅलेंडर?


नोव्हेंबर 1952 मध्ये भारत सरकारने प्रोफेसर 'मेघनाद साहा' यांच्या अध्यक्षतेखाली एक कॅलेंडर सुधारणा समिती स्थापन केली होती. ज्यांच्या शिफारशींवर एक राष्ट्रीय दिनदर्शिका तयार केली जाण्याचे काम सुरू झाले. या समितीने ग्रेगोरियन कॅलेंडरच्या तारखांसह सौर दिनदर्शिका अधिकृत कारणांसाठी वापरण्याची शिफारस केली. यासोबतच समितीने आणखी अनेक शिफारशी केल्या, ज्या सरकारने स्वीकारल्या. त्यानंतर हे अधिकृत कॅलेंडर तयार करण्यात आले.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha