Baljit Kaur News: सर्वात मोठं शिखरं कमी वेळात सर करुन भारताचं नाव लौकिक मिळवणाऱ्या बलजीत कौर यांचा नेपाळ येथील अन्नपुर्णा या 8 हजार 91 मीटर उंचीच्या शिखरावर अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. संबधित संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आली आहे. पूरक ऑक्सिजनचा वापर न केल्यामुळे त्यांचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांचा शोध घेण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
नेपाळमधील (Nepal) अन्नपूर्णा पर्वतावरून (Annapurna) बेपत्ता झालेल्या हिमाचल प्रदेशातील गिर्यारोहक (Mountaineer) बलजीत कौर (Mountaineer Baljeet Kaur) जिवंत असल्याची माहिती मिळत आहे. पायोनियर अॅडव्हेंचरचे अध्यक्ष पासांग शेर्पा यांनी यासंदर्भात माहिती दिली. हवाई शोध पथकाला बलजीत कौर यांच्यासंदर्भात माहिती मिळाली आहे. त्यानुसार, त्यांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, बलजीत कौर यांनी पूरक ऑक्सिजनचा वापर न करता जगातील दहावं सर्वोच्च शिखर सर केलं आहे. पण तिथून कॅम्प-4 च्या दिशेनं परतत असताना बलजीत कौर बेपत्ता झाल्या आहेत. तेव्हापासूनच त्यांचा शोध सुरू होता.
बलजीत कौर यांना सुरक्षित बेसकॅम्पवर आणण्यासाठी बचावकार्य सुरू
बलजीत कौर या अन्नपूर्णा पर्वतावरुन खाली येत असताना बेपत्ता झाल्या होत्या. तेव्हापासूनच त्यांचा शोध घेतला जात होता. त्यानंतर एमर्जन्सी सिग्नलनुसार त्यांचे जीपीएस लोकेशन 7 हजार 335 मीटरवर आढळून आले आहे. त्यांनी सोमवारी संध्याकाळी 5:15 वाजता दोन शेरपा गाईड्ससोबत अन्नपूर्णा पर्वत सर केला होता. पण त्यानंतर मात्र त्या बेपत्ता होत्या, सध्या बलजीत कौर यांचा शोध घेण्यासाठी तीन हेलिकॉप्टर्स रवाना झाली आहेत.
यापूर्वी बलजीत कौर यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण त्याचं पायोनियर अॅडव्हेंचर्सच्या वतीनं खंडन करण्यात आलं आहे. पायोनियर अॅडव्हेंचर्सच्या म्हणण्यानुसार, गिर्यारोहक बलजीत कौर अद्याप बेपत्तात आहे आणि त्यांचा सिग्नल 7,375 मीटर उंचीवर असल्याचं कळालं आहे.
एबीपी न्यूजशी बोलताना बलजीत कौर काय म्हणाल्या?
यावर्षी 23 जानेवारीला बलजीत कौर हिमाचल प्रदेशचे क्रीडा मंत्री विक्रमादित्य सिंह यांना आर्थिक मदतीसाठी भेटायला आल्या होत्या. यादरम्यान, एबीपी न्यूजशी संवाद साधताना बलजीत कौर म्हणाल्या की, त्यांना ऑक्सिजनशिवाय आठ हजार मीटर उंचीचं अन्नपूर्णा शिखर सर करायचं आहे. त्यांनी सांगितलं की, आठ हजार मीटर हे डेथ झोन मानलं जातं आणि ऑक्सिजनशिवाय ते सर करणं खूप कठीण आहे. एकतर त्या शिखर सर करतील किंवा काहीतरी शिकून परत येतील. ऑक्सिजनशिवाय या शिखरावर गेल्यानं जीवही जाऊ शकतो, पण त्यांना याची भीती नाही, असंही त्या म्हणाल्या होत्या.