मुंबई : आंध्र प्रदेशातील गोपीचंद थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळ पर्यटक बनले आहेत. पहिला भारतीय स्पेस टुरिस्ट बनण्याचा इतिहास गोपीचंद थोटाकुरा यांनी रचला आहे. भारतीय वैमानिक आणि व्यावसायिक पायलट गोपीचंद थोटाकुरा यांनी नुकताच अंतराळ प्रवास करून इतिहास रचला आहे. गोपीचंद भारतातील पहिला अंतराळ पर्यटक ठरले आहेत. अमेरिकेत राहूनही त्यांनी भारताच्या शिरपेचाच मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या अंतराळ पर्यटनाचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे. यामुळे, भविष्यात इतरांना अंतराळात प्रवास करण्याचे मार्ग खुले झाले आहेत.


अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती


स्पेस टूर करणाऱ्या गोपीचंद थोटाकुरा यांनी त्यांचा अंतराळात कॅप्सुलमधील व्हिडीओ शेअर केला आहे. या  व्हिडीओमध्ये त्यांच्या हातात भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा दिसत आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ सध्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 


आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास


आंध्र प्रदेशातील गोपीचाद थोटाकुरा यांनी स्पेट टूर कराताना हातात तिरंगा ध्वज घेतलेला दिसत आहे. ब्लू ओरिजिन कंपनीच्या पर्यटन रॉकेटमधून त्यांनी स्पेस टूर केली आहे.ब्लू ओरिजिनच्या पर्यटन रॉकेटमध्ये प्रवास करत गोपीचंद यांनी अवकाशातून पृथ्वी पाहिली. याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. गोपीचंद यांच्या या यशाचा संपूर्ण भारत आनंद साजरा केला जात आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे.


ब्ल्यू ओरिजिनच्या रॉकेटमधून पाहिलं अवकाश


गोपीचंद थोटाकुरा यांनी 19 मे 2024 रोजी ब्ल्यू ओरिजिन नावाच्या कंपनीच्या स्पेसक्राफ्टमधून अंतराळ प्रवासासाठी उड्डाण केलं होतं. ब्ल्यू ओरिजिन ही खाजगी अंतराळ कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी अवकाशात प्रवास करू इच्छिणाऱ्या लोकांना पर्यटनाची संधी देते. या संपूर्ण प्रवासात टेकऑफ ते लँडिंगपर्यंत फक्त दहा मिनिटे लागली. यावेळी अंतराळयान पृथ्वीपासून सुमारे 105 किमी वर पोहोचले होते. अंतराळातील हा सर्वात लहान आणि जलद प्रवास होता. 


पाहा व्हायरल व्हिडीओ






कसा होता अंतराळ पर्यटनाचा अनुभव?


अंतराळ प्रवासाचा अनुभव सांगताना गोपीचंद म्हणाले की, "हे अदभुत होतं. हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला ते तुमच्या डोळ्यांनी पाहावं लागेल. अंतराळातून जग पाहण्यात काय आनंद होतो, याचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही. प्रत्येकाने अवकाशात जायला हवं. दुसऱ्या बाजूने पृथ्वी पाहणं खूप छान अनुभव आहे.