नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एबीपी न्यूजशी खास बातचीत केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधत ते म्हणाले की, त्यांनी पंजाबच्या तीन कोटी लोकांना उघडपणे धमकावले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आरोप केला की, गृहमंत्र्यांनी 4 जूननंतर पंजाब सरकार बरखास्त करून भगवंत मान यांना हटवू, असे सांगितले आहे.


भाजपवर निशाणा साधला


सीएम केजरीवाल म्हणाले, "मला विचारायचे आहे की ते हे कसे करतील. आमच्याकडे 119 पैकी 92 आमदार आहेत. ते ईडी पाठवतील, सीबीआय पाठवतील का? त्यांच्या तोंडाल रक्त लागलं आहे. या लोकांनी अनेक सरकार पाडली आहेत आणि उघडपणे गुंडगिरी करत आहेत."


इंडिया आघाडीला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील


मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, "मोदींना 400 जागा का हव्या आहेत? त्यांना कोणीतरी विचारले. 300 नेही काम होऊ शकते. एससी, एसटी आणि ओबीसीचे आरक्षण संपवण्याची त्यांची पूर्ण तयारी आहे. त्यांच्या 200 पेक्षा कमी जागा येतील. त्यांच्याविरोधात जनतेमध्ये राग आहे. इंडिया आघाडीला 300 जागा मिळतील. 


'मी भगत सिंग यांचा शिष्य'


सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यास ते तुरुंगात जातील का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, "मी भगत सिंग यांचा शिष्य आहे. भगतसिंग तुरुंगातून मुक्त होण्यासाठी तुरुंगात गेले होते आणि त्यांना फाशी देण्यात आली. मी देशाची सेवा करत आहे, मी देशाला वाचवण्यासाठी तुरुंगात जात आहे." सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 21 दिवसांची मुदत दिली होती. सीएम केजरीवाल यांनी हा 'देवाचा चमत्कार' असल्याचे म्हटले होते.


इतर महत्वाच्या बातम्या