रावी नदीवर शाहपूर-कानडीचं बांधकाम सुरु झालं आहे. हे सर्व राष्ट्रीय प्रकल्प असल्याचंही गडकरींनी सांगितलं.
1960 साली विश्व बँकेच्या मध्यस्थीने झालेल्या सिंधू जल करारानुसार चिनाब (बियास), सतलज आणि रावी या पूर्ववाहिनी नद्यांचं नियंत्रण भारताकडे, तर सिंधू, चिनाब (चंद्रभागा) आणि झेलम या पश्चिमवाहिनी नद्यांचं नियंत्रण पाकिस्तानकडे आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये अद्याप जलयुद्ध झालेलं नाही.
झेलम, चिनाब, रावी, सतलज आणि सिंधू या पाच नद्या पाकिस्तानात वाहतात. झेलम नदी 774 किलोमीटर लांब असून ती चिनाबची उपनदी आहे. झेलमचा उगम काश्मिरमध्ये होत असून ती श्रीनगर मार्गे पाकिस्तानात वाहत जाते.