Indian Corona Vaccine : जगभरातील 110 देशांनी भारत बायोटेकने तयार केलेली कोरोना लस कोवॅक्सीन (Covaxin) आणि भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली लस कोवाशील्ड (Covishield) मान्यता दिली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. "110 देशांनी कोविड-19 लस Covaxin आणि Covishield ला मान्यता दिलीय,” एका अधिकाऱ्याने सांगितले. 


इतर देशांशी चर्चा सुरु 


केंद्र सरकार जगातील उर्वरीत देशांशी सर्पकात आहे, कारण सर्वात मोठ्या COVID-19 लसीकरण कार्यक्रमाचे लाभार्थींना मान्यता मिळेल. ज्यामुळे शिक्षण, व्यवसाय आणि पर्यटन हेतूंसाठी त्यांचा प्रवास सुलभ होईल. अशी अपेक्षा आहे की लवकरच कोविशील्ड आणि कोवॅक्सीनला उर्वरित देशातही मान्यता मिळू शकेल.


दरम्यान, भारताने आतापर्यंत कोविडशील्ड आणि कोवॅक्सीनचे सर्वाधिक डोस दिले आहेत, त्यामुळे या लसींचे डोस घेतलेल्या लोकांना या लसींना मान्यता नसलेल्या देशांमध्ये प्रवास करणे शक्य होत नाही. कारण, कोरोनाची परिस्थिती पाहता बहुतेक देशांनी परदेशी प्रवाशांना त्यांची लस घेतलेल्याची माहिती देणे बंधनकारक केले आहे.


असे अनेक देश आहेत ज्यांचे राष्ट्रीय मान्यताप्राप्त किंवा WHO-मान्यताप्राप्त लसींसाठी लसीकरण प्रमाणपत्रांच्या परस्पर मान्यता देण्याबाबत भारतासोबत करार आहेत. परंतु, असे अनेक देश आहेत ज्यांचा सध्या भारतासोबत असा कोणताही करार नाही.


भारतातील लसीकरणाचे अपडेट्स


आत्तापर्यंत भारतातील लोकांना एकूण 115 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी 76.19 कोटी लोकांना पहिला डोस आणि 39.08 कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. भारतात 16 जानेवारीपासून कोरोनाविरुद्ध लसीकरण सुरू झाले.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधीत बातम्या



Vaccination : ‘कोव्हिशील्ड’वाले आणि ‘कोवॅक्सिन’वाले; देशात दोन नवे वर्ग, केरळ उच्च न्यायालयाची टिपण्णी