Smriti Irani New Book Lal Salaam : अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यानंतर राजकारणात एन्ट्री करत केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झालेल्या स्मृती इराणी आता नव्या रुपात आपल्या समोर येणार आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या पहिल्या ‘लाल सलाम’ या पुस्तकाची घोषणा त्यांनी ट्वीटरवर एक टीझर टाकत केली आहे. लाल सलाम या पुस्तकाचं प्रकाशन वेस्टलॅंड नावाच्या प्रकाशन कंपनीनं केलं असून हे पुस्तक 29 नोव्हेंबर रोजी येणार आहे. हे पुस्तक अॅमेझॉनवरून प्री-ऑर्डर केले जाऊ शकते, असं स्मृती इराणी यांनी ट्विटमध्ये सांगितलंय.
हे पुस्तक एप्रिल 2010 मध्ये छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये झालेल्या हल्ल्याशी संबंधित आहे. दंतेवाडा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यापासून प्रेरित असलेलं हे पुस्तक आहे. या हल्ल्यात 76 जवान शहीद झाले होते. स्मृती इराणी म्हणाल्या की, अनेक वर्षांपासून ही गोष्ट मनात सुरू होती. मग मी ही कथा कागदावर उतरवण्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष न करता लिहायला घेतली. मला आशा आहे की हे पुस्तक वाचणारे लोक पुस्तकाचा आनंद घेतील, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
स्मृती इराणींचं वेट लॉस ट्रांसफॉर्मेशन; चाहते आश्चर्यचकित, मागत आहेत वजन कमी करण्याच्या टिप्स
विक्रम प्रताप सिंह यांची कहाणी
लाल सलाम ही एक तरुण अधिकारी असलेल्या विक्रम प्रताप सिंह यांची कहाणी आहे. विक्रम प्रताप यांना राजकारण आणि भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या व्यवस्थेचा कसा सामना करावा लागतो हे या पुस्तकात सांगितले आहे. प्रकाशनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या पुस्तकाची माहिती देताना, नक्षलवादी भागात आव्हानांचा सामना करणाऱ्या अधिकाऱ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली आहे.