Har Ghar Tiranga Campaign : यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. भारताच्या 75 व्या स्वातंत्र दिनानिमित्त (Independence Day) देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. 75 व्या स्वातंत्र दिनानिमित्त देशात 'हर घर तिरंगा' अभियान (Har Ghar Tiranga Campaign) राबवलं जात आहे. या अभियानाचा एक भाग बनण्याचा प्रयत्न भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard) जवानांनी केला आहे. तटरक्षक दलाच्या जवानांनी समुद्रामध्ये तिरंगा फडकावला आहे.


भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देत सांगितलं की, 'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत तटरक्षक दलाच्या जवानांनी समुद्राखाली जाऊन तिरंगा फडकवला आहे. भारतीय तटरक्षक दलाने 'हर घर तिरंगा अभियाना'चा भाग म्हणून समुद्रात पाण्याखालील ध्वज डेमो दिला, असं अधिकाऱ्याने सांगितले. या उपक्रमाचा उद्देश लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे.






हर घर तिरंगा उपक्रम


देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे स्वातंत्र्याच अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा प्रत्येक घरावर फडकवण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने सूचना देखील केल्या आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या